If you want to protect your Aadhaar card from scammers, you can lock your Aadhaar card in this way. Dainik Gomantak
अर्थविश्व

हो, आधार नंबरवरुनही बँक अकाउंट हॅक होऊ शकते; असे लॉक करा तुमचे आधार कार्ड

How To Lock Your Aadhaar Card: जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड स्कॅमर्सच्या जाळ्यातून वाचवायचे असेल, तर तुम्ही तुमचे आधार कार्ड अशा प्रकारे लॉक करू शकता.

Ashutosh Masgaunde

If you want to protect your Aadhaar card from scammers, you can lock your Aadhaar card in this way:

आजच्या काळात बहुतांश आर्थिक कामे आधार कार्डशी कनेक्ट आहेत. आधार कार्डाशिवाय कोणत्याही सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमध्ये तुम्हाला काही काम असेल तर त्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे.

प्रत्येक सरकारी योजनेपासून ते कोणत्याही स्वरूपात अर्ज करण्यासाठीही तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे.

याचबरोबर बँक खाती देखील आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे काढण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे अनेक बॅंक खातेधारकांना सातत्याने चिंता असते की आधार कार्डच्या नंबरद्वारे आप खाते हॅक होऊन आपल्याला अर्थिक फटका बसेल.

लोकांना भीती वाटते की त्यांनी आधार कार्ड क्रमांक कोणाला सांगितल्यास त्याद्वारे त्यांचे खाते हॅक होऊ शकते. ET च्या अहवालानुसार, IndusInd बँकेचे अनिल राव म्हणाले की, "तुमचा आधार क्रमांक कोणाला माहीत असला तरी, तुमच्या बँक खात्यावर ताबा मिळवणे कोणालाही शक्य नाही. ते म्हणाले की, तुम्ही कोठे बायोमेट्रिक, स्कॅनर डिव्हाइसवर UIDAI OTP, फेस आयडी किंवा आयरिस वापरला नसला तर तुमचे बँक खाते सुरक्षित आहे.

काही सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या रिपोर्ट्सनुसार, ऑनलाइन गुन्हेगारांनी AePS (Aadhaar Enabled Payment System) द्वारे प्रॉपर्टी रजिस्ट्री कागदपत्रांमधून लोकांच्या बोटांचे ठसे कॉपी करून बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले आहेत. अशी काही प्रकरणे 2022 मध्ये समोर आली होती.

आधार पेमेंट सिस्टम किती सुरक्षित आहे?

आधारद्वारे पेमेंट करणार्‍या यूजर्सकडून पैसे चोरण्यासाठी सायबर गुन्हेगार वापरत असलेल्या पद्धती पाहता, सरकारने सुरक्षा प्रोटोकॉल अपडेट केले आहेत. वित्त मंत्रालयाच्या निवेदनानुसार, फिंगरप्रिंट-आधारित आधार प्रमाणीकरणादरम्यान बनावट फिंगरप्रिंटचा वापर करून EPS फसवणूक टाळण्यासाठी UIDAI ने इन-हाउस AI प्रणाली लागू केली आहे.

बायोमेट्रिक डेटा कसा अपडेट करायचा

UIDAI नुसार, तुम्ही तुमचा आधार वापरत नसल्यास, तुम्ही ते लॉक करू शकता. जेव्हाही तुम्हाला हा पर्याय वापरायचा असेल तेव्हा तुम्ही UIDAI वेबसाइटवर जाऊन ते अनलॉक करू शकता. यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर कोणीही करू शकणार नाही.

आधार कार्ड कसे लॉक करावे

आधार कार्ड लॉक करण्यासाठी तुमच्याकडे 16 अंकी VID क्रमांक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे व्हीआयडी नसल्यास, तुम्ही तो एसएमएस किंवा UIDAI वेबसाइट (www.myaadhaar.uidai.gov.in) द्वारे जनरेट करू शकता. SMS साठी मेसेजमध्ये GVID लिहा, नंतर स्पेद देऊन UID चे शेवटचे 4 किंवा 8 अंक लिहा आणि 1947 वर SMS करा.

  • व्हीआयडी मिळाल्यानंतर, UIDAI वेबसाइटवर जा (https://resident.uidai.gov.in/aadhaar-lockunlock).

  • My Aadhaar टॅबमध्ये Aadhaar Lock आणि Unlock वर क्लिक करा.

  • UID लॉक रेडिओ बटण निवडा.

  • आता तुमचा UID क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड एन्टर करा आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा.

  • Send OTP वर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करा.

  • तुमचा UIDAI यशस्वीरित्या लॉक केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT