Success Story: वडील मारतात म्हणून घर सोडलं, भांडी धुवायचे काम केलं, डोसा किंग आता वर्षाला कमावतात 300 कोटी

Jairam Banan: वडिलांच्या पाकिटातून पैसे चोरून ते मुंबईला (Mumbai) पळून आले. ही गोष्ट आहे 1967 सालची. मुंबईत त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये भांडी धुवायचे काम मिळवून दिले.
Success Story Of Dosa King Jairam Banan
Success Story Of Dosa King Jairam BananDainik Gomantak

Success Story Of Dosa King Jairam Banan Who Foundes Sagar Ratna restaurant chain earns more than 300 crores:

एखादी यशस्वी व्यक्तीच दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा देऊ शकते, म्हणूनच आपल्याला यशस्वी लोकांच्या संघर्षमय जीवनाबद्दल जाणून घेण्यात रस असतो. यशापर्यंत पोहोचण्याच्या अशा धडपडीच्या प्रेरणादायी गोष्टी आपल्याला कठीण परिस्थितीतही हार न मानण्याची आणि पुढे जात राहण्याची प्रेरणा देतात.

जयराम बनन यांची गोष्टही अशीच आहे, ज्यांनी आयुष्यातील सर्वात वाईट काळातही प्रयत्न सुरू ठेवले पण हार मानली नाही. त्याचाच परिपाक म्हणजे आज ते देशातील यशस्वी उद्योगपतींपैकी एक मानले जातात.

Success Story Of Dosa King Jairam Banan
Success Story Of Dosa King Jairam BananDainik Gomantak

परीक्षेत नापास झाले अन् घर सोडले

जयराम बनन यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूर जवळील Udupi येथे झाला. त्याचे वडील ड्रायव्हर होते आणि स्वभावानेही खूप रागीट होते. जयराम यांना लहानपणापासूनच वडिलांची खूप भीती होती.

कारण जयराम शाळेच्या परीक्षेत नापास झाले की त्यांचे वडील त्यांना मारायचे. कितीतरी वेळा डोळ्यात मिरची पावडर टाकायचे. त्यानंतर वयाच्या १३ व्या वर्षी परीक्षेत नापास झाल्यावर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

वडिलांच्या पाकिटातून पैसे चोरून ते मुंबईला (Mumbai) पळून आले. ही गोष्ट आहे 1967 सालची. मुंबईत त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये भांडी धुवायचे काम मिळवून दिले.

त्यावेळी जयराम यांची मजुरी केवळ १८ रुपये होती. त्यांनी 6 वर्षे कठोर परिश्रम केले आणि नंतर वेटर आणि पुढे हॉटेल व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली.

मग एक वेळ अशी आली की त्यांनी स्वतःचा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी देशाची राजधानी दिल्लीची निवड केली.

Sagar Ratna Restaurant Chain
Sagar Ratna Restaurant Chain Dainik Gomantak

भांडी घासण्यापासून ते 300 कोटींपर्यंत मजल

जीवनातील संघर्षाचा सामना करत जयराम बनन यांनी स्वत:च्या हिमतीवर सागर रत्न रेस्टॉरंटसारखे प्रसिद्ध फूड आउटलेट सुरू केले.

काही रुपयांच्या मजुरीवर भांडी घासणारे जयराम बनन यांनी आज ३०० कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. सध्या जयराम यांचे 60 हून अधिक आउटलेट आज देशभरात सुरू आहेत.

Success Story Of Dosa King Jairam Banan
Success Story: हसण्या खेळण्याच्या वयात उभारली 100 कोटींची कंपनी; मुंबईच्या तिलकची महिन्याला करोडोंची कमाई
Jairam Banan Known As Dosa King
Jairam Banan Known As Dosa King Dainik Gomantak

दिल्लीपासून सुरू झाला यशाचा प्रवास

जयराम 1974 मध्ये दिल्लीत आले आणि गाझियाबादमध्ये सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे ​​कॅन्टीन चालवण्यासाठी घेतले. या कॅन्टीनमध्ये त्यांनी 2000 रुपये गुंतवले होते. त्यानंतर त्यांनी 1986 मध्ये दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये पहिले रेस्टॉरंट उघडले. त्यांनी या रेस्टॉरंटला सागर असे नाव दिले.

येथून त्यांनी पहिल्या दिवशी 408 रुपये कमावले. त्यांनी जेवणाच्या दर्जाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्याचा परिणाम असा झाला की लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले आणि त्याच्या व्यवसायाला गती मिळाली.

चार वर्षांनंतर, त्यांनी दिल्लीत दुसरे रेस्टॉरंट उघडले आणि त्याचे नाव Sagar Ratna असे ठेवले. कालांतराने सागर रतन हा ब्रँड बनला.

Success Story Of Dosa King Jairam Banan
Success Story: घरच्यांकडून पॉकेटमनी मागायच्या वयात, ड्रॉप आऊट तरुणाने उभारली 7300 कोटींची कंपनी

जयराम बनन आज प्रत्येकासाठी प्रेरणास्थान

Jairam Banan यांच्या सागर रत्नचे आज केवळ देशातच नाही तर कॅनडा, सिंगापूर, बँकॉक येथेही आउटलेट आहेत. जयराम बनन यांना Dosa King म्हणूनही ओळखले जाते. सागर रत्नशिवाय त्यांनी 2001 मध्ये स्वागत नावाची आणखी एक Restaurant Cain सुरू केली.

जयराम बनन हे आज त्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत ज्यांच्याकडे धैर्य, समर्पण आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता आहे परंतु परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल नाही. अशा लोकांना त्यांच्याकडून शिकता येईल की जर आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि कठोर परिश्रमाने पुढे जात राहिलो तर आपल्याला यश नक्कीच मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com