Online money transfer is expensive

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताय, तर मोजावी लागणार एवढी रक्कम

SBI ग्राहकांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे आता महाग होणार आहे, कारण बँकेने त्वरित पेमेंट सेवेची (IMPS) मर्यादा वाढवली आहे.

दैनिक गोमन्तक

तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (Bank of India) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. SBI ग्राहकांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे आता महाग होणार आहे, कारण बँकेने त्वरित पेमेंट सेवेची (IMPS) मर्यादा वाढवली आहे. त्याचबरोबर आता ग्राहकांना या अंतर्गत अधिक शुल्क भरावे (Online money transfer is expensive) लागणार आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS व्यवहारांसाठी नवीन स्लॅब जोडला गेला आहे.

रु. 1,000 पर्यंत रक्कम पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. तर 1001 ते 10,000 रुपये पाठवल्यास 2 रुपये अधिक GST शुल्क आकारले जाईल. दुसरीकडे, 10,001 ते 1 लाख रुपये पाठवल्यास 4 रुपये अधिक जीएसटी लागू होईल. याशिवाय, जर तुम्ही रु. 1,00,001 ते रु. 2 लाखांपर्यंत ट्रान्सफर केले तर तुम्हाला 12 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, 2,00,001 ते 5 लाख रुपये पाठवण्यासाठी 20 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल.

IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवल्यास, 20 रुपये अधिक GST आकारले जाईल. IMPS द्वारे ग्राहक एका दिवसात कमाल 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतील. याआधी ही मर्यादा 2 लाख रुपये होती, परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने IMPS द्वारे व्यवहार करण्याच्या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती.

IMPS म्हणजेच तात्काळ मोबाईल पेमेंट सेवेद्वारे कोणत्याही खातेदाराला पैसे कधीही पाठवले जाऊ शकतात. या अंतर्गत, पैसे पाठवण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही. तुम्ही IMPS द्वारे फक्त काही सेकंदात, दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस पैसे ट्रान्सफर करू शकता.

तर ऑनलाइन शॉपिंग, पॉलिसीचे प्रीमियम भरणे, शाळा-कॉलेजची फी आणि इतर बिले भरणे यासारखी महत्त्वाची कामेही करू शकता. भारतात ऑनलाइन बँकिंगद्वारे पैसे कुठेही, कधीही हस्तांतरित केले जाऊ शकतात. वास्तविक, ऑनलाइन बँकिंगमधून पैसे हस्तांतरित करण्याचे तीन मार्ग आहेत, ज्याद्वारे रक्कम हस्तांतरित केली जाते. यामध्ये IMPS, NEFT, RTGS या नावांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT