Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Privatisation: या सरकारी बँकेची लवकरच होणार विक्री, अर्थ मंत्रालयाने दिली मोठी अपडेट

IDBI बँकेच्या खाजगीकरणासंदर्भात संभाव्य बोलीदारांच्या वतीने चौकशी किंवा प्रश्न सादर करण्याची अंतिम मुदत 13 दिवसांनी वाढवून 10 नोव्हेंबर करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

IDBI Bank: IDBI बँकेच्या खाजगीकरणासंदर्भात संभाव्य बोलीदारांच्या वतीने चौकशी किंवा प्रश्न सादर करण्याची अंतिम मुदत 13 दिवसांनी वाढवून 10 नोव्हेंबर करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने 7 ऑक्टोबर रोजी प्राथमिक मेमोरँडम (PIM) जारी केला होता, ज्यामध्ये IDBI बँकेतील सुमारे 61 टक्के हिस्सा विकण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या.

चौकशीची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली

इच्छुक बोलीदारांना प्रश्न विचारण्यासाठी आणि बोली सादर करण्यासाठी अनुक्रमे 28 ऑक्टोबर आणि 16 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) गुरुवारी पीआयएमशी संबंधित एक शुद्धीपत्र जारी केले आणि चौकशीची अंतिम मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली.

पुढील वर्षी मार्चपर्यंत निविदा प्राप्त होतील

पुढील वर्षी मार्चपर्यंत आयडीबीआय बँकेसाठी (IDBI Bank) आर्थिक बोली मिळण्याची सरकारची अपेक्षा आहे. एप्रिल 2023 पासून सुरु होणार्‍या पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत खाजगीकरण प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या बँकेत सरकारचा 45.48 टक्के हिस्सा आहे, तर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा (LIC) 49.24 टक्के हिस्सा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT