IDBI Bank Latest News  Dainik Gomantak
अर्थविश्व

IDBI Bank : खातेधारकांसाठी खुशखबर; बँकेने ठेवींवरील व्याजदरात केला बदल

IDBI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे.

दैनिक गोमन्तक

HDFC बँकेनंतर आता आणखी एका खाजगी बँकेने करोडो ग्राहकांना खुशखबर दिली आहे. पूर्वी ही बँक सरकारी होती पण आता ती खाजगी बँक झाली आहे. ती बॅंक म्हणजे IDBI बँक. IDBI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. त्यानंतर आता एफडी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. व्याजदरातील बदल 20 एप्रिलपासून लागू होणार आहे. (IDBI Bank changes interest rates on deposits)

किमान व्याज दर 2.70 टक्के

बदलानंतर, IDBI बँक 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.70 टक्के ते 5.60 टक्के व्याज देत आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही एफडी ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे.

IDBI बँकेने 7 दिवसांपासून 30 दिवसांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांच्या ठेवींवर 2.7 टक्के पहिला व्याजदर कायम ठेवला आहे. 31 दिवस ते 45 दिवस या कालावधीत आता 2.80 टक्क्यांऐवजी 3 टक्के व्याज मिळेल. माहितीनुसार, आयडीबीआय बँकेची ग्राहक संख्या सुमारे 3 कोटी आहे. पूर्वी ही बँक अर्ध सरकारी होती, जी आता पूर्णपणे खाजगी झाली आहे.

IDBI बँक FD व्याजदर नवीन व्याजदर खालीलप्रमाणे :

  • दिवस 07-14: 2.7 टक्के

  • 15-30 दिवस: 2.7 टक्के

  • 31-45 दिवस: 3 टक्के

  • 46-60 दिवस: 3.25 टक्के

  • 61-90 दिवस: 3.4 टक्के 3.9

  • 91 दिवस ते 6 महिने: 3.75 टक्के

  • 6 महिने ते 270 दिवस: 4.4%

  • 271 दिवसांपासून ते 1पेक्षा कमी : 4.5 टक्के

  • 1 वर्षासाठी : 5.15 टक्के

  • 1 वर्ष ते 2 वर्षे: 5.25 टक्के

  • 2 वर्षे ते 3 वर्षे: 5.35 टक्के

  • 3 वर्षे ते 5 वर्षे: 5.5 टक्के

  • 5 वर्षांसाठी: 5.6%

  • 5 वर्षे ते 7 वर्षे: 5.6%

  • 7 वर्षे ते 10 वर्षे: 5.5 टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT