Hyundai Next Gen Creta Hybrid Launch Features And Updates
ह्युंदाई मोटर इंडियाने या वर्षी इलेक्ट्रिक क्रेटा मार्केटमध्ये आणली, जीला कारप्रेमींची चांगलीच पसंती मिळाली. आता कंपनी नेक्स जनरेशन क्रेटा आणत आहे. कंपनी याबाबत युद्धपातळीवर काम करत आहे. कंपनीने आगामी मॉडेलला 'SX3' असे कोडनेम दिले आहे. यावेळी क्रेटामध्ये मोठे बदल होणार आहेत. जर तुम्हीही नवीन क्रेटाची वाट पाहत असाल, तर त्यात काही खास असणार आहे. चला तर याबाबत जाणून घेऊया...
रिपोर्ट्सनुसार, हायब्रिड क्रेटामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असणार आहे. त्यात मोठी बॅटरी आणि मोटर असेल. असे मानले जाते की, कारची रेंज एकदम चांगली असणार आहे. कंपनी पहिल्यांदाच हायब्रिड इंजिन असलेली गाडी लॉन्च करणार आहे. भारतात (India) ह्युंदाईची ही अफलातून कार थेट मारुती सुझुकी ग्रँड विटाराशी स्पर्धा करणार आहे. नवीन क्रेटा हायब्रिड कधी लॉन्च केली जाऊ शकते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की, 2027 पूर्वी कंपनी हे नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणू शकते.
हुंडई हायब्रिड क्रेटा ही थेट मारुती सुझुकी ग्रँड विटाराशी स्पर्धा करेल, ज्याची किंमत 11.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या एसयूव्हीचा प्लस पॉइंट हा हायब्रिड तंत्रज्ञान आहे. यात 1462 सीसी आणि 1490 सीसी असे दोन इंजिन ऑप्शन आहेत, जे 102 बीएचपी पॉवर आणि 137 एनएम टॉर्क निर्माण करतात. ही इंजिने 20.58 आणि 27.97 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देतात. सुरक्षिततेसाठी, मारुती ग्रँड विटारामध्ये 6-एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट, स्पीड अलर्ट, पार्किंग सेन्सर आणि 360 डिग्री कॅमेरा असे फिचर्स आहेत.
नवीन क्रेटा इलेक्ट्रिकची किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरु होते. त्यात दोन बॅटरी पॅकचा ऑप्शन आहे. यात 51.4 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक असेल जो एका चार्जवर 472 किमीची रेंज देईल. तर 42 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक एका चार्जवर 390 किमीची रेंज देईल. ही कार फक्त 7.9 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडू शकते. सुरक्षेसाठी, त्यात 6 एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग, ADAS लेव्हल 2, ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट आणि ESP सारखे फिचर्स दिसू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.