Hyundai पासून Maruti Suzuki पर्यंत, 'या' शानदार कारवर Valentines Week मध्ये मिळणार बंपर ऑफर!

Best Car Discounts Valentine’s Week: व्हॅलेंटाईन वीक खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला नवीन कार भेट देण्याचा विचार करत आहात का?
Hyundai पासून Maruti Suzuki पर्यंत, 'या' शानदार कारवर Valentines Week मध्ये मिळणार बंपर ऑफर!
Hyundai CarDainik Gomantak
Published on
Updated on

Best Car Discounts Valentine’s Week: व्हॅलेंटाईन वीक खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला नवीन कार भेट देण्याचा विचार करत आहात का? असाल तर ह्युंदाई आणि मारुती सुझुकीच्या मॉडेल्सवर तुम्हाला बंपर ऑफर मिळू शकते. हॅचबॅकपासून ते एसयूव्ही मॉडेल्सपर्यंत, मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत. या वाहनांवरील सवलतींचा फायदा तुम्हाला व्हॅलेंटाईन वीक दरम्यानही देखील घेता येईल.

Hyundai Grand i10 Nios Price आणि डिस्काउंट डिटेल

दरम्यान, या हॅचबॅकच्या 2024 मॉडेलवर 68 हजार रुपयांची सूट मिळेल. 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या या कारची किंमत 5 लाख 98 हजार 300 रुपयांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरु होते. सीएनजीसह (CNG) सर्व प्रकारांवर 68,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

Hyundai Aura Price आणि डिस्काउंट डिटेल

होंडा अमेझ आणि मारुती सुझुकी डिझायरशी स्पर्धा करणाऱ्या ह्युंदाईच्या या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे 2024 मॉडेल तुम्हाला 53 हजार रुपयांच्या सवलतीसह मिळेल. ही कार सीएनजी पर्यायात देखील उपलब्ध आहे. या कारची किंमत 6 लाख 54 हजार 100 रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.

Hyundai पासून Maruti Suzuki पर्यंत, 'या' शानदार कारवर Valentines Week मध्ये मिळणार बंपर ऑफर!
Hyundai ने Exeter ची नाईट एडिशन केली लॉन्च; खास तुमच्यासाठी!

Hyundai Exter Price आणि डिस्काउंट डिटेल

ह्युंदाईची ही परवडणारी एसयूव्ही टाटा मोटर्सच्या लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार टाटा पंचशी स्पर्धा करते. तुम्हाला ही ह्युंदाई कार आत्ताच 40,000 रुपयांच्या सवलतीसह मिळेल, या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग्जची सुविधा आहे. या एसयूव्हीची किंमत 5 लाख 99 हजार 9000 रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.

Maruti Suzuki Cars Discount

GaadiWaadi च्या अहवालानुसार, मारुती सुझुकी नेक्साच्या 2025 मॉडेल्सवर 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध असेल, तर 2024 मॉडेल्सवर 2 लाख 15 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध असेल.

Hyundai पासून Maruti Suzuki पर्यंत, 'या' शानदार कारवर Valentines Week मध्ये मिळणार बंपर ऑफर!
Nexon EV चे दणक्यात अनावरण, Hyundai Kona Electric, Mahindra XUV400 EV देणार टक्कर

Maruti Suzuki Ignis Price

या कारच्या 2025 मॉडेलवर 63,100 रुपयांची सूट दिली जात आहे, तर 2024 मॉडेलवर 78,100 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5 लाख 85 हजार रुपये (एक्स-शोरुम) आहे.

Maruti Suzuki Baleno Price

मारुतीची ही हॅचबॅक कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे, या कारच्या 2024 मॉडेलवर 62,100 रुपयांपर्यंत आणि 2025 मॉडेलवर 42,100 रुपयांपर्यंत सूट मिळेल. या हॅचबॅकची किंमत 6 लाख 70 हजार रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.

Hyundai पासून Maruti Suzuki पर्यंत, 'या' शानदार कारवर Valentines Week मध्ये मिळणार बंपर ऑफर!
CNG Cars: दमदार मायलेज आणि धासू फिचर्स! 'या' 3 CNG कार तुम्ही पाहिल्यात का?

Maruti Suzuki Invicto Price

मारुतीच्या या कारवर सर्वाधिक सूट दिली जात आहे, या कारच्या 2024 मॉडेलवर 2.15 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे, तर 2025 मॉडेलवर 1.15 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. या कारची किंमत 25.51 लाख रुपये (एक्स-शोरुम) ते 29.22 लाख रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com