Nexon EV चे दणक्यात अनावरण, Hyundai Kona Electric, Mahindra XUV400 EV देणार टक्कर

Tata Nexon EV बाजारात Hyundai Kona Electric, Mahindra XUV400 EV आणि MG ZS EV शी स्पर्धा करेल. कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल सारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.
Tata Motors has now unveiled the Nexon EV facelift
Tata Motors has now unveiled the Nexon EV faceliftDainik Gomantak
Published on
Updated on

Tata Motors has now unveiled the Nexon EV facelift:

नेक्सॉन फेसलिफ्टचे अनावरण केल्यानंतर, टाटा मोटर्सने आता नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्टचेही अनावरण केले आहे. कंपनीने यामध्ये पूर्वीप्रमाणे अनेक बदल केलेले आहेत. मिड-लाइफ मेकओव्हर असूनही, नवीन Nexon EV फेसलिफ्टला बाहेरून आणि आत दोन्ही बाजूंनी एक आकर्षक डिझाईन आहे

नवीन नेक्सॉन इलेक्ट्रिक SUV मध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. टाटा मोटर्स 14 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे नेक्सॉन लाँच करणार आहे. पण कंपनीने लॉन्चपूर्वी 2023 Nexon EV फेसलिफ्टची पहिली झलक दाखवली आहे.

या कारमध्ये अवघ्या 9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्याची क्षमत आहे. Tata Nexon EV ला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 453 किमीची रेंज असेल. यात 40.5 kWh क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आहेत. कारमध्ये 30.2 kWh बॅटरी पॅकचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

Tata Motors has now unveiled the Nexon EV facelift
ATM मधून पैसे काढण्यासाठी आता कार्डची गरज नाही; UPI द्वारे या पाच स्टेप्समध्ये मिळवा कॅश

ही स्टायलिश कार अवघ्या 56 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. या कारमध्ये 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टम देण्यात आली आहे. Tata Nexon EV ला पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. नवीन कार डॅशिंग लूकमध्ये असेल. 2023 Tata Nexon EV चे बुकिंग 9 सप्टेंबरपासून सुरू होईल. ही कार 14 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे.

कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा आहे. Tata Nexon ला ग्लोबल NCAP कार क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले आहे.

Tata Motors has now unveiled the Nexon EV facelift
दमदार कंटेंटमधून 'हे' भारतीय YouTubers कमावतात करोडो रुपये

यंदा Tata Nexon EV मध्ये लेदरेट अपहोल्स्ट्री आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहेत. या कारमध्ये टच बेस्ड क्लायमेट कंट्रोल उपलब्ध असणार आहे. कारमध्ये समोरच्या पुढच्या सीट्स हवेशीर आहेत. याला 245 Nm टॉर्क आहे.

Tata Nexon EV बाजारात Hyundai Kona Electric, Mahindra XUV400 EV आणि MG ZS EV शी स्पर्धा करेल. कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल सारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com