Share Market  Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर खरेदी करण्यापूर्वी पहिले करा 'ही' कामे

लवकरच LIC चा आयपीओ (IPO) लॉंच होणार आहे.

दैनिक गोमन्तक

एलआयसी पॉलिसीधारकांसाठी अतिशय फायदेशीर बातमी आहे. जर तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी इन्शुरन्स कार्पोरेशन च्या आयपीओची वाट पाहत असाल, तर तुम्हाला प्रथम परमनंट अकाउंट नंबर (PAN) अपडेट करावा लागेल. एलआयसीच्या (LIC) वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पॉलिसीधारकांनी लवकरात लवकर त्यांचा पॅन त्यांच्या एलआयसी पॉलिसीशी लिंक करावा.

लवकरच LIC चा आयपीओ (IPO) लॉन्च होणार आहे. शेअर बाजारातील तज्ञांवर विश्वास ठेवला, तर सरकार आगामी अर्थसंकल्पात याबाबत खुलासा करू शकते. अशा परिस्थितीमध्ये पॉलिसीधारकांसाठी हि एक मोठी कामाइची संधी असेल. अलीकडेच विमा कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांना एक महत्वाचा संदेश दिला होता ज्यामध्ये त्यांना पॉलिसीसी पॅन लिंक करण्यास आणि आयपीओ मध्ये सहभागी होण्यासाठी डिमॅट खाते उघडण्यास सांगितले होते. यामुळे तुम्ही जर तुमचा पॅन अपडेट नसेल केला तर जाणून घेऊया कसे लिंक करायचे.

एलआयसी च्या डेटाबेसमध्ये तुमचा पॅन नंबर असा करा अपडेट

* LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://licindia.in/.

* ऑनलाईन पॅन नोंदणीचा पर्यंत निवडावा.

*ऑनलाईन पॅन नोंदणी पृष्ठावर क्लिक करावे.

*नंतर त्यावर procced बटनावर क्लिक करावे.

* तुमचा ईमेल पत्ता, पॅन, मोबाईल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक टाकावा.

*नंतर बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाकावा

*तुमच्या मोबाइल नंबरवर विनंती करा

*ओटीपी मिळाल्यानंतर तो भरा आणि सबमिट करा.

* फॉर्म सबमिट केल्ल्यानंतर यशस्वी नोंदणीचा संदेश येईल.

या प्रकार पॅन स्टेटस तपास

* https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus या साईडवर जा.

* नंतर पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन क्रमांक टाका, तसेच कॅप्चा टाकावा आणि नंतर सबमिटवर क्लिक करावे.

*प्रोसेस पूर्ण झाल्यावर, तुमचा पॅन स्टेटस दिसेल.

केंद्र सरकार LIC चा IPO च्या तयारीत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार एलआयसीचा आयपीओ मार्च मध्ये लॉंच केला जाईल. 15 मार्चच्या आसपास लॉंच होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT