'या' शहरांमध्ये कमी किंमतीत घर करा खरेदी

बँक ऑफ इंडिया (Bank of India) देशभरात इ-लिलाव आयोजित करणार आहे.
Mumbai
Mumbai Dainik Gomantak

जर तुम्ही नवीन वर्षात घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल , तर बँक ऑफ इंडिया (BOI) तुम्हाला स्वस्त घर (Home) खरेदी करण्याची संधी देत आहे. देशातील सरकारी बँक तुम्हाला स्वस्त घर घेण्यासाठी खास ऑफर (Offer) देत आहे. वास्तविक बँक ऑफ इंडिया (Bank of India) देशभरात इ-लिलाव आयोजित करणार आहे. यामुळे तुम्ही 25 जानेवारीला बोली लावू शकता. असेही माहिती बँकेने ट्विट करून दिली आहे.

बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार बँक 250 हुन अधिक मालमत्ताचा लिलाव करत आहे. यामध्ये मालमत्ताच्या चार श्रेणीचा समावेश आहे. 1) फ्लॅट 2)ऑफिस स्पेस 3) जमीन, इमारत आणि व्यावसायिक दुकाने. बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,"असाधारण दरांवर उत्तम मालमता खरेदी करण्याच्या या संधीचा फायदा घ्या. 25 जानेवारी 2022 रोजी बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या बँक ऑल इंडिया प्रॉपर्टी लिलावामध्ये सहभागी व्हा.

Mumbai
84 रुपयांचा शेअरमध्ये करू शकता तुम्ही बंपर कमाई, जाणून घ्या

बँक ठराविक वेळेत इ लिलाव करते , जी डिफॉल्टच्या यादीत दिसून आली आहे. म्हणजेच ज्या मालमतेच्या मालकांनी कर्जाची परतफेड केली नाही किंवा कोणत्याही कारणाने पैसे भरू शकले नाहीत,अशा सर्व लोकांच्या जमिनी बँक ताब्यात घेतात आणि नंतर वेळोवेळी अशा मालमतेच्या बँकेकडून लिलाव केला जातो. या लिलावामध्ये बँक मालमत्ता विकून तिची देय रक्कम वसूल करते.

बोली लावण्यासाठी काय करावे?

सर्वंप्रथम https://ibapi.in/ या इ सेल्स पोर्टलवर नोंदणी करा, त्यानंतर https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्ही लॉगिन करू शकता. बोलीदाराने हे लक्षात ठेवावे कि, त्यासाठी KYC कागदपत्रे आवश्यक आहेत. जी इ लिलाव सेवा प्रदात्याद्वारे सत्यापित केली जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com