Bitcoin | Cryptocurrency  
अर्थविश्व

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

how to buy cryptocurrency in India: क्रिप्टो चलन खरेदी करण्यापूर्वी प्लॅटफॉर्मबाबत पुरेशी माहिती घ्यावी. योग्य अभ्यास करुन क्रिप्टो चलन खरेदीचा निर्णय घेण्याचा सल्ला गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ देतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

क्रिप्टो चलन अस्तित्वात येऊन आता बराच काळ लोटला आहे. जगभरात आता हे चलन स्वीकारले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन मीम कॉईन लॉन्च करण्याची घोषणा केलीय. तर, दुसरीकडे बिटकॉईनची किंमत देखील एक कोटींच्या घरात पोहोचली आहे. भारतात मात्र अजुनही क्रिप्टो चलनाबाबत अनेक संभ्रम आहेत.

क्रिप्टो चलन काय आहे? ते कसं काम करतं? भारतात ते कोठुन आणि कसं खरेदी करता येईल? याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नाही. याचबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

क्रिप्टो चलन काय आहे?

क्रिप्टो चलन एक डिजीटल अभासी चलन आहे. चलनाच्या आदान – प्रदानासाठी क्रिप्टोग्राफी या सुरक्षीत प्रणालीचा वापर केला जातो. बिटकॉईन, इथेरियम, टीथर, बिनेंस कॉईन असे काही क्रिप्टो चलनाचे प्रकार आहेत.

भारतात कोठे खरेदी करता येईल क्रिप्टो चलन?

भारतात क्रिप्टो चलन खरेदी करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. CoinDCX, Coinswithc, coinbase यासारख्या काही प्लॅटफॉर्मवरुन क्रिप्टो चलन खरेदी करता येऊ शकते. दरम्यान, क्रिप्टो चलन खरेदी करण्यापूर्वी प्लॅटफॉर्मबाबत पुरेशी माहिती घ्यावी. योग्य अभ्यास करुन क्रिप्टो चलन खरेदीचा निर्णय घेण्याचा सल्ला गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ देतात.

क्रिप्टो खरेदी करण्याची पद्धत काय आहे?

१)  क्रिप्टो चलन खरेदी करण्यापूर्वी संबधित एक्सचेंज प्लॅटफॉर्मचा खोलवर अभ्यास करुन माहिती घ्यावी, आणि अकाऊंट सुरु करावे.

२)  खाते उघडल्यानंतर प्राथमिक केवायसी पूर्ण करुन घ्यावी. यासाठी आधार, पॅन कार्ड आणि सेल्फी घ्यावी लागेल.

३)  खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर खात्यात १०० ते त्यापेक्षा अधिक पैसे जमा करावे लागतील.

४)  आता एक्सचेंजवरुन तुम्हाला हवा तो क्रिप्टो चलन निवडून, खात्यात उपलब्ध पैशानुसार ऑर्डर द्यावी.

५)  ऑर्डर दिल्यानंतर काही वेळातच क्रिप्टो चलन तुमच्या डिजीटल खात्यात जमा होईल.

क्रिप्टोत गुंतवणूक करताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या टीप्स

क्रिप्टो व्यवहारात वेगाने चढ – उतार होत असतात त्यामुळे येथे व्यवहार करताना फार काळजीपूर्वक करावेत.

क्रिप्टोत तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी नवीन असाल तर सुरुवात कमी रक्कमेतून करावी.

खरेदी – विक्री व्यवहारासाठी विश्वासार्ह प्लॅटफॉर्मची निवड करावी. व्यवहार करण्यापूर्वी चांगला अभ्यास करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT