DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Honeytrap extortion attempt: संशयित महिलेने बँक मॅनेजरला मैत्रिणीच्या फ्लॅटवर बोलवून संशयित महिलेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
Blackmail case Karnataka
honeytrap caseDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक: बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून दहा लाख रुपये उकळण्याचा डाव कर्नाटक पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी पोलिसांनी नारळपाणी विक्री करणाऱ्या महिलेसह तिच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात १२ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नारळपाणी विक्री करणाऱ्या महिलेने बँकेच्या मॅनेजरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे ही महिला गेल्या अनेक वर्षापासून इंडी येथील डीवायएसपी कार्यालयाशेजारी नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करत होती. महिलेने मॅनेजरला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून दहा लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला.

Blackmail case Karnataka
Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

याप्रकरणी बँकेच्या मॅनेजरने इंडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. महिलेने मॅनेजरसोबत जवळीक वाढवत हळूहळू त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

मॅनेजरला मैत्रिणीच्या फ्लॅटवर बोलवून संशयित महिलेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, याचे चित्रिकरण केल्याचा दावा करुन महिलेने मॅनेजरला धमकावण्यास सुरुवात केली.

Blackmail case Karnataka
'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

शारीरिक संबंधाचा व्हिडिओ माझ्या जवळ असल्याचे सांगून महिलेने मॅनेजरकडे दहा लाख रुपये मागण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओचे चित्रिकरण करणारा व्यक्ती युट्युब पत्रकार असल्याचे समोर आले आहे.

मॅनेजरने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित महिला, पत्रकार आणि इतर साथीदारांना अटक केली  आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com