Honda Scoopy Dainik Gomantak
अर्थविश्व

Honda Scoopy: लूकमध्ये भारी, फीचर्समध्ये झक्कास; 'ही' स्कूटर परत येत आहे नव्या अवतारात

Honda New Scooty: होंडा पुन्हा एकदा भारतातील स्कूटर प्रेमींना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाली आहे. लोकप्रिय रेट्रो स्टाईल स्कूटर 2025 Honda Scoopy चे पेटंट भारतात दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Sameer Amunekar

Honda पुन्हा एकदा भारतातील स्कूटर प्रेमींना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय रेट्रो स्टाईल स्कूटर 2025 Honda Scoopy चे पेटंट भारतात दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे. ही स्कूटर फक्त सुंदर दिसणारीच नाही, तर अत्याधुनिक फीचर्ससह परत येणार असल्याचे संकेत आहेत.

Honda Scoopy चे डिझाईन हे पारंपरिक रेट्रो लूक असले तरी त्याला आधुनिकतेची जबरदस्त जोड दिली गेली आहे. स्कूटरमध्ये क्रिस्टल ब्लॉक एलईडी हेडलाइट, गोल टेल लॅम्प, D-शेप इंडिकेटर्स आणि स्टायलिश अलॉय व्हील्स आहेत. स्लीक बॉडी पॅनल आणि सिंगल पीस आरामदायक सीट यामुळे लुकसोबतच राइडिंग एक्सपीरियन्सही जबरदस्त आहे.

Scoopy मध्ये 109.5cc एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे सुमारे 9 BHP पॉवर आणि 9.2 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये CVT गिअरबॉक्स दिला गेला असून, शहरी भागात चालवण्यासाठी ही एक परफेक्ट स्कूटर ठरणार आहे.

फीचर्स

Honda Scoopy ही स्कूटर केवळ आकर्षक लूकपुरती मर्यादित नाही, तर ती आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेली एक परिपूर्ण यंत्रणा आहे. यात LCD डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असून, सर्व माहिती सहज वाचता येते. स्मार्ट की व कीलेस स्टार्ट सिस्टीम यामुळे स्कूटर सुरू करण्यासाठी चावीची गरज भासत नाही, तर एक टचमध्ये सुरु होते.

अँटी-थेफ्ट अलार्म स्कूटरच्या सुरक्षिततेची हमी देतो, तर संपूर्ण एलईडी लाइटिंग सिस्टीम रात्रीच्या वेळी अधिक चांगली दृश्यमानता आणि स्टायलिश अपील देते. एकंदरीतच, Scoopy ही एक फीचर-पॅक आणि स्मार्ट स्कूटर आहे.

भारतात लाँच होणार का?

Scoopy भारतात पेटंट झाल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली असली तरी Honda कडून अद्याप अधिकृत लॉन्चबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

अनेक ऑटो एक्स्पर्ट्सच्या मते, Honda सध्या आपले डिझाईन आणि ट्रेडमार्क सुरक्षित करत आहे. मात्र, जर ही स्कूटर लाँच झाली, तर ती Yamaha Fascino, Suzuki Access आणि Vespa S यांना जबरदस्त टक्कर देऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT