Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

Prakritik Kheti Khushhal Kisan: 'या' राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा खास प्लॅन!

Prakritik Kheti Khushhal Kisan: गेल्या काही वर्षांत नैसर्गिक शेती करण्याकडे कल झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासनाकडूनही यासाठी मदत केली जात आहे.

Manish Jadhav

Prakritik Kheti Khushhal Kisan: गेल्या काही वर्षांत नैसर्गिक शेती करण्याकडे कल झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासनाकडूनही यासाठी मदत केली जात आहे. हिमाचल प्रदेशच्या कृषी विभागाने 2023-24 मध्ये अतिरिक्त 30,000 एकर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या राज्यात 1.59 लाख शेतकरी (Farmer) सुमारे 50 हजार एकर जमिनीवर नैसर्गिक शेती करत आहेत.

दरम्यान, कृषी सचिव राकेश कंवर यांनी 'प्राकृतिक खेती खुशाल किसान योजने'च्या अधिकाऱ्यांना खरीप हंगामापूर्वी नैसर्गिक शेती अंतर्गत क्षेत्र विस्तारावर काम करण्यास सांगितले आहे.

प्राकृत शेती खुशाल किसान योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्यांनी अधिकाऱ्यांना खरीप हंगामातील बाजरी उत्पादन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले.

त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था वेळेत करावी, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी प्रशिक्षित शेतकरी आणि नवीन शेतकरी यांच्यात वारंवार चर्चेचे आयोजन करावे. याद्वारे प्रशिक्षित शेतकरी त्यांचे अनुभव सांगू शकतील.

त्यांनी पुढे असेही सांगितले की, अशी क्षेत्रे ओळखली पाहिजे, जिथे लोक स्वतःहून नैसर्गिक शेती करण्यास तयार आहेत. अशा भागांना नैसर्गिक गावे किंवा पंचायत म्हणून घोषित करण्याची रणनीती तयार करावी.

नैसर्गिक शेती म्हणजे काय?

नैसर्गिक शेतीतून उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांची बाजारपेठेत मागणी वाढत आहे. नैसर्गिक शेती ही शेतीची (Agriculture) प्राचीन पद्धत आहे. या शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. या प्रकारच्या शेतीमुळे जमिनीची सुपीक क्षमता वाढते.

तसेच, रासायनिक खतांवर कमी अवलंबून राहिल्याने शेतीसाठी खर्चही कमी येतो. नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT