PM Kisan Scheme Update: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही शेतकरी असाल तर आता तुम्हाला केंद्र सरकारकडून पूर्ण 3 लाख रुपये मिळत आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. आता केंद्र सरकार (Government) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची भेट देत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
पीएम किसान योजनेव्यतिरिक्त, सरकार शेतकऱ्यांना KCC योजनेची सुविधा देत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना लाखोंचा लाभ मिळत आहे. अर्थमंत्री सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी पीएम किसान सन्मानच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे आदेश दिले होते.
देशातील सर्वात कमी व्याजदरात या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, KCC कर्जाच्या रकमेत सरकारकडून सबसिडीही जाहीर केली जाते.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजाने पैसे मिळतात. शेतीच्या कामात गरज पडेल तेव्हा बहुतांश शेतकरी त्यातून पैसे घेतात. शेतकऱ्यांना (Farmer) सावकारांच्या तावडीतून आणि चढ्या व्याजापासून वाचवण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली.
किसान क्रेडिट कार्ड योजनेत देशातील शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. जर शेतकऱ्याने कर्जाची रक्कम वेळेवर परत केली तर शेतकऱ्याला व्याजदरात 3 टक्के सूट दिली जाते.
म्हणजेच, कर्जाच्या रकमेवर फक्त 4 टक्के व्याज शिल्लक आहे. आगामी काळात देशातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जुलै 2022 पर्यंत, सरकारच्या एका विशेष मोहिमेअंतर्गत, 3 कोटींहून अधिक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेशी जोडले गेले आहेत.
या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 18 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्ती अर्ज करु शकतात. येत्या काही दिवसांत ही रक्कम सरकारकडून 5 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
तसेच, बँकांना पीएम किसान निधी योजनेचा डेटा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी वापरण्यास सांगितले आहे. पीएम किसानच्या वेबसाइटवर किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म देखील देण्यात आला आहे. तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर फॉर्म भरा आणि कोणत्याही बँकेत सबमिट करा आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.