HDFC Life to acquire Exide Life Insurance for mega prize
HDFC Life to acquire Exide Life Insurance for mega prize Dainik Gomantak
अर्थविश्व

Insurance क्षेत्रात मोठी डील, HDFC Life कडून Exide Life ची 6 हजार कोटींना खरेदी

दैनिक गोमन्तक

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स (HDFC Life), विमा क्षेत्रातील (Life Insurance) खासगी जीवन विमा कंपनीने शुक्रवारी एक्साइड लाइफ इन्शुरन्स (Exide Life) खरेदी करण्याची घोषणा केली आहे. एक्साइड लाईफने आपला विमा व्यवसाय (Insurance Company) विकण्यास सहमती दर्शवली आहे. हा करार 6,687 कोटी रुपयांचा असेल. एचडीएफसी लाइफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, एक्साइड इंडस्ट्रीज आणि एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या मंडळांनी या कराराला मंजुरी दिली आहे.(HDFC Life to acquire Exide Life Insurance for mega prize)

एक्साइड इंडस्ट्रीज ही देशातील बॅटरी बनविणारी नंबर -1ची कंपनी आहे. 2013 मध्ये कंपनीने आयएनजी वैश्य लाइफ इन्शुरन्स विकत घेतले. कंपनीमध्ये आधीच 50 टक्के हिस्सा होता आणि आता त्याने उर्वरित भाग 550 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. Xide इंडस्ट्रीजने ING कडून 26 टक्के हिस्सा घेतला होता. यामध्ये कोठारी समूहाचा 16.32 टक्के आणि एनम ग्रुपचा 7.68 टक्के हिस्सा होता. हे देखील एक्साइडने खरेदी केले होते.

आता एचडीएफसी लाइफ एक्साइड इंडस्ट्रीजकडून एक्साइड लाइफ इन्शुरन्सचा 100% भाग खरेदी करेल. यासाठी कंपनी एक्साइड इंडस्ट्रीजला 8,70,22,222 शेअर्स 685 रुपये प्रति शेअर दराने जारी करेल.हा करार 726 कोटी रुपयांना होणार आहे . अशा प्रकारे, हा संपूर्ण करार 6,687 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार आहे.

ग्राहकांचं काय होणार

तज्ञांचे म्हणणे आहे की या सौद्याचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही. त्यांचे धोरण आणि सेवा पूर्वीप्रमाणेच सुरूच राहतील.

काय आहे नेमका करार

या करारानुसार, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स एक्साइड लाइफ इन्शुरन्समध्ये 100 टक्के भाग खरेदी करणार आहे. हा संपूर्ण करार 6690 कोटी रुपयांच्या जवळपास असेल. ज्यामध्ये एचडीएफसी लाइफ 685 रुपये किंमतीवर एक्साइड इंडस्ट्रीजला 8.70 कोटी शेअर्स जारी करेल. त्याचबरोबर 72.6 कोटी रुपये रोख स्वरूपात दिले जातील. एक्साइड इंडस्ट्रीजने आतापर्यंत आपल्या विमा विभागात 168 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

कोणाला होईल फायदा

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि एक्साइड इंडस्ट्रीज या दोन्हीकडे दीर्घकालीन फायदेशीर करार आहे. पण अल्पावधीसाठी किंवा आज एक्साइड इंडस्ट्रीज निश्चितपणे विजेता ठरेल. या सौद्यासाठी एक्साइड लाइफ इन्शुरन्सचे मूल्यांकन 28 ते 32 रुपये होते, परंतु हा करार 79 रुपयांच्या मूल्यांकनावर करण्यात आला आहे. म्हणजेच एक्साईडला यातून भरपूर पैसे मिळत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे एक्साइडचे शेअर्स अल्पावधीत तेजीत राहतील आणि त्यात पैसे गुंतवले पाहिजेत. स्टॉक आणखी 250 रुपयांपर्यंत मजबूत होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT