भारतात मोठ्या प्रमाणात बिजनेस असलेले लोकल सर्च इंजिन जस्ट डायल (Just Dial) या कंपनीवर आता मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स रिटेल (Reliance Retail) व्हेंचर्सची मालकी असणार आहे. कारण आता जस्ट डायल कंपनीच्या बोर्डाने रिलायन्स रिटेलला मोठ्या प्रमाणात आपले शेअर्स (Just Dial Shares) विकण्यास मान्यता दिली आहे.(Mukesh Ambani's Reliance now owns Just Dial with 41 shares allotment)
रिलायन्सने जस्ट डायलचे 2.12 कोटी शेअर्स विकत घेतले
जस्ट डायल ने गुरुवारी कळवले की त्याच्या बोर्डाने कंपनीचे 2.12 कोटी शेअर्स रिलायन्स रिटेल व्हेंचर्सला देण्यास मंजुरी दिली आहे. शेअर्सचे हे वाटप 1,022.25 रुपये प्रति शेअरच्या आधारावर केले गेले आहे. 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यासह या शेअर्सवर कंपनीला 1,012.25 रुपयांचा प्रीमियम प्राप्त झाला आहे आणि त्यांना प्राधान्य तत्त्वावर खाजगी प्लेसमेंटद्वारे वाटप करण्यात आले आहे.
रिलायन्स रिटेलचा 41% जस्ट डायलमध्ये हिस्सा
या शेअर वाटपाबाबत रिलायन्स रिटेलकडून अधिकृत निवेदनही आले आहे. यानंतर, जस्ट डायलच्या एकूण पेड-अप शेअर कॅपिटलमध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा हिस्सा 40.98%असेल. जस्ट डायल लिमिटेडचे संपूर्ण नियंत्रण आता मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपकडे असणार आहे.
रिलायन्स रिटेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी जुलैमध्ये त्याने जस्ट डायलचे 1.31 कोटी शेअर्स घेतले होते. यासाठी, कंपनीने जस्ट डायलला 10 रुपये चे मूल्य असलेल्या शेअरसाठी प्रति शेअर 1,020 रुपये दिले होते.
रिलायन्सचा किरकोळ व्यवसाय वाढेल
या अधिग्रहणानंतर रिलायन्सला जस्ट डायलचा कोट्यवधी व्यापाऱ्यांचा डेटा बेस मिळणार आहे . जस्ट डायलमध्ये 25 वर्षांची सूची असल्याने हि सूची रिलायन्सचा किरकोळ व्यवसाय वाढण्यास मदत करेल.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स ही एक होल्डिंग कंपनी आहे जी रिलायन्स इंडस्ट्रीज अंतर्गत संपूर्ण किरकोळ व्यवसायाची देखरेख करते. रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील किरकोळ क्षेत्रात आपली आघाडी निर्माण करण्यासाठी हळूहळू काम करत आहे. म्हणून, कंपनीने फ्युचर ग्रुपच्या फ्युचर रिटेलशी देखील करार केला आहे. तथापि, अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनसोबत यासंदर्भात सतत वाद सुरू आहे आणि ही बाब अजूनही न्यायालयात प्रविष्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.