HDFC Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC खातेधारकांसाठी मोठी अपडेट, डेटा लीक! बँकेचे म्हणणे आले समोर

HDFC Bank Scam: तुमचे खातेही HDFC बँकेत असेल तर ही बातमी नक्की वाचा. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Manish Jadhav

HDFC Bank Scam: तुमचे खातेही HDFC बँकेत असेल तर ही बातमी नक्की वाचा. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

दरम्यान, एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांचा डेटा लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या 6 लाख ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा केला जात आहे. या अहवालात ग्राहकांची पर्सनल माहिती लीक झाल्याचा दावा केला जात आहे.

अहवाल आल्यानंतर लोक नाराज झाले

लोकप्रिय सायबर गुन्हेगारी मंचावर ग्राहकांची (Customers) माहिती पोस्ट केली गेली आहे. यासंबंधीचे अहवाल समोर आल्यानंतर लोक प्रचंड नाराज झाले आहेत.

सायबर गुन्हेगारांनी खातेदारांची नावे, ई-मेल, पत्ते आणि मोबाइल नंबरशी संबंधित डेटा लीक केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 6 लाख लोकांचा लीक झालेला डेटा डार्क वेबवर टाकण्यात आला आहे.

HDFC बँक स्टेटमेंट

या संपूर्ण प्रकरणावर एचडीएफसी बँकेकडून (HDFC Bank) निवेदनही आले आहे. बँकेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करुन असा दावा फेटाळला आहे.

एचडीएफसी बँकेचा कोणताही डेटा लीक झालेला नाही, असे बँकेच्या बाजूने सांगण्यात आले आहे. आमच्या सिस्टीमवर कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला झालेला नाही, असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. ग्राहकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे.

बँकेने पुढे असेही सांगितले आहे की, बँकिंग इकोसिस्टमचे संपूर्ण निरीक्षण आहे. डेटा सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता आहे. असे दावे बँकेने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT