Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

Pension Scheme: पेन्शनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, आता दरमहा वाढणार...

Pension: पेन्शनच्या माध्यमातून लोकांना ठराविक वेळेत ठराविक रक्कम मिळते. दुसरीकडे, सेवानिवृत्त लोकांना पेन्शनचा भरपूर लाभ मिळतो.

Manish Jadhav

Pension: पेन्शनच्या माध्यमातून लोकांना ठराविक वेळेत ठराविक रक्कम मिळते. दुसरीकडे, सेवानिवृत्त लोकांना पेन्शनचा भरपूर लाभ मिळतो. आता हरियाणा सरकारने पेन्शनबाबत एक महत्त्वाची घोषणा केली असून, त्यामुळे लोकांना मिळणार्‍या पेन्शनच्या रकमेत वाढ होणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाचा अर्थसंकल्प सादर करताना पेन्शनशी संबंधित माहिती दिली आहे.

हरियाणा बजेट

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरुवारी विधानसभेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, 'राज्यातील जनतेवर कोणताही नवीन कर लादला जाणार नाही.'

खट्टर यांच्याकडे राज्याच्या अर्थ मंत्रालयाचाही कार्यभार आहे. त्यांनी येत्या आर्थिक वर्षासाठी 1,83,950 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला आहे, जो 1,64,808 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा 11.6 टक्के अधिक आहे.

नवीन कर नाही

भाजप (BJP) आणि जेजेपी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री खट्टर यांनी विधानसभेत सांगितले की, अर्थसंकल्पात नवीन कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. यासोबतच सीएम खट्टर यांनी पेन्शन योजनेबाबतही महत्त्वाची घोषणा केली. त्याचा फायदा अनेकांना होणार आहे.

सामाजिक सुरक्षा पेन्शन

अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शन सध्याच्या 2500 रुपये प्रति महिना वरुन 2750 रुपये प्रति महिना करण्याची घोषणा केली. यासोबतच हरियाणा गाय संरक्षण सेवा आयोगाचा निधी सध्याच्या 40 कोटींवरुन 400 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचाही प्रस्ताव होता. 2023-24 मध्ये किमान 65,000 नियमित पदे भरण्याची घोषणा त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2026: मंगळ-गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी योग'! 3 राशींचे लोक होणार मालामाल; नोकरीत मिळणार मोठी पगारवाढ

Viral Post: 'कंजूष' कंपनीची करामत!पगारवाढीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना दिलं 1 लीटर पाणी अन् बिस्किट! पोस्ट होतेय व्हायरल

Bicholim Bus Stand: डिचोली बसस्थानकात बेशिस्तपणा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या धोक्याने प्रवासी त्रस्त

Goa Politics: आमदार वीरेश बोरकरने मनोजला दिले आव्हान! संस्थापक सदस्य, समित्य‍ांशी चर्चेअंतीच पुढील निर्णय

US Israel Iran Conflict: इराण युद्धाच्या रणनीतीवरुन ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात फोनवर कडाक्याचं भांडण; अमेरिकेच्या भूमिकेमुळे इस्रायल नाराज VIDEO

SCROLL FOR NEXT