GST महसुलाचे संकलन 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त  Dainik Gomantak
अर्थविश्व

जीएसटी संकलनाच्या आकडयात लक्षणीय वाढ

आर्थिक सुधाराचे लक्षण ;GST महसुलाचे संकलन 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

दैनिक गोमन्तक

11 नोव्हेंबर केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड (Bhagavat Karad) यांनी गुरुवारी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनात झालेली वाढ हे दर्शवीत आहे की महामारीने ग्रासलेली अर्थव्यवस्था वेगाने पुनरुज्जीवनाच्या मार्गावर आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये GST महसुलाचे संकलन 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. हा आकडा ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत 24 टक्के अधिक आहे. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. येथे एका राष्ट्रीय कर परिसंवादाला संबोधित करताना कराड म्हणाले, "जीएसटी संकलनाबाबत आम्हाला चिंता आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये GST महसुलाचे संकलन 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. हा आकडा ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत 24 टक्के अधिक आहे. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

"आम्ही जीएसटी संकलनाच्या संदर्भात 1.30 लाख कोटी रुपयांवर पोहोचलो आहोत. या कर संकलनावरून हे दिसून येते की आम्ही आर्थिक पुनरुज्जीवनाच्या मार्गावर आहोत," असे कराड यांनी येथे एका राष्ट्रीय कर चर्चासत्राला संबोधित करताना सांगितले.

अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, जीएसटीच्या अंमलबजावणीत काही अडथळे निर्माण झाले होते, परंतु कर तज्ज्ञांकडून आलेल्या सूचनांमुळे या समस्याही हळूहळू दूर झाल्या.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक समावेशन, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहार या तीन प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचा अर्थसंकल्प सात वर्षांत दुपटीने वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT