FM Nirmala Sitharaman  Dainik DainikGomantak
अर्थविश्व

GST Council Meeting: ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना कोणताही दिलासा नाही, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार 'हा' नियम

GST Council Meeting Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली.

Manish Jadhav

GST Council Meeting Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली. ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, या पावसाळी अधिवेशनात जीएसटी कायदा (दुरुस्ती) संसदेत मांडला जाईल.

त्याचबरोबर, त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होऊ शकते. अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की, जीएसटी परिषदेने मान्य केले आहे की, ऑनलाइन गेमिंगवरील नियम लागू झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर त्यावर विचार केला जाईल.

नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कॅसिनो यांना 28 टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.

पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, दिल्ली, सिक्कीम आणि गोव्याच्या मंत्र्यांनी ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटीचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे.

6 महिन्यांनंतर बदल होऊ शकतात

पत्रकार परिषदेदरम्यान महसूल सचिव म्हणाले की, “6 महिन्यांनंतर ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोवरील 28 टक्के जीएसटीच्या टॅक्स दरामध्ये काही बदल जाणवला तर तो अधिसूचनेद्वारे केला जाईल. त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज भासणार नाही.''

अर्थमंत्र्यांनी कॅसिनोबाबत सांगितले

पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, समजा कॅसिनोचे प्रवेश शुल्क रु. 1000 आहे. आणि आत जाऊन, तुम्ही100 रुपयाच्या गेममध्ये 300 रुपये जिंकता. अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त 1000 रुपयांवर जीएसटी (GST) भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

क्रीडा विश्वात शोककळा, ऑलिंपिक पदक विजेत्या दिग्गज खेळाडूचं निधन; अशी होती त्यांची कारकीर्द

Horoscope: नोकरीत यश, अडकलेले पैसे परत; शनी-बुधाच्या सम सप्तक राजयोगाने 'या 3' राशींना मिळणार बंपर फायदा

Mapusa: म्हापसा पालिकेचं सभागृह 'स्वातंत्र्यदिन समूहगीत' स्पर्धेसाठी पडले अपुरे, ढिसाळ नियोजनमुळे शिक्षकांत नाराजी

Mungul Firing Case: कोलव्‍यातील मार्गारिटा हॉटेलचाही हल्ल्याशी संबंध? व्हेन्झी व्‍हिएगस यांचा आरोप, मुंगूल गँगवॉरबाबत कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT