Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत सरकारने केले 5 मोठे बदल, माहित नसेल तर...

दैनिक गोमन्तक

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेतही गुंतवणूक केली आहे का? जर होय, तर तुम्हाला या गुंतवणूक योजनेत सरकारने केलेल्या बदलांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. मुलींच्या भवितव्यासाठी सरकार चालवत असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 7.60 टक्के व्याजदर आहे. इथे गुंतवणूक केल्याने, तुम्हाला कलम 80C अंतर्गत आयकरातून सूटही मिळते.

दरम्यान, सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY) बदललेल्या नियमांतर्गत, खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. तसेच खात्यावरील वार्षिक व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाईल. यापूर्वी ते तिमाही आधारावर खात्यात जमा केले जात होते.

पूर्वीच्या, नियमांच्या आधारे, मुलीच्या (Girl) नावावर खाते असेल तर ती 10 वर्षांची असताना खाते चालवू शकते. परंतु बदलानंतर मुलींना 18 वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी नाही. मुलीचे वय वर्ष 18 पूर्ण होईपर्यंत फक्त तिचे पालक खाते चालवतील.

तसेच, SSY खात्यात दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. जर तुम्ही रक्कम जमा केली नाही तर तुमचे खाते डीफॉल्ट मानले जाते. खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मुदतपूर्तीपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज जमा होत राहील. पूर्वी हा नियम नव्हता.

सुरुवातीच्या नियमांनुसार, आयकर कलम 80C (80C) अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. पण आता जर पहिल्या मुलीनंतर दुस-यांदा जुळ्या मुलींचा जन्म झाला तर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलीसाठीही सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता. अशा प्रकारे एक व्यक्ती तीन मुलींचे खाते उघडू शकते.

तसेच, मुलीचा मृत्यू झाल्यास किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास ‘सुकन्या समृद्धी योजना’ खाते बंद करण्याची तरतूद यापूर्वी होती. मात्र आता त्यात खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश झाला आहे. आता पालकाच्या मृत्यूनंतरही खाते मुदतपूर्व बंद करुन पैसे काढता येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT