8th Pay Commission Latest Update Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी, 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार भरघोस वाढ; मोदी सरकारने दिली मंजूरी

8th Pay Commission Salary Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वाढणार आहेत.

Manish Jadhav

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वाढणार आहेत. सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. चला तर मग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार आहे ते जाणून घेऊया...

पगार/पेन्शन किती वाढेल?

दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार अनेक पटींनी वाढेल असा अंदाज लावला जात आहे. मात्र यामध्ये किती तथ्य आहे हे फक्त सरकारलाच माहिती आहे. परंतु ताज्या अहवालांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात फक्त 10 ते 30 टक्के वाढ अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की, ज्या व्यक्तीला 1 लाख रुपये पगार मिळत आहे, त्याचा पगार वाढीनंतर 1,30,000 रुपये होईल.

वाढीव पगार आणि पेन्शन कधी मिळेल?

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव पगार आणि पेन्शन (Pension) कधी मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास काही तज्ञांचे असे मत आहे की, आठव्या वेतन आयोगाची शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू केली जाऊ शकते. जर कोणत्याही कारणास्तव आठवा वेतन आयोग वेळेवर लागू झाला नाही आणि अंमलबजावणीला विलंब झाला, तर सरकार 1 जानेवारीपासून वाढीव रक्कम जोडून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पैसे देईल. म्हणजे त्यांना या पैशावर थकबाकीही मिळेल.

फिटमेंट फॅक्टर किती असणार?

आठव्या वेतन आयोगात कमाल फिटमेंट फॅक्टर 2.86 असण्याची अपेक्षा आहे आणि जर असे झाले तर या आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 51480 रुपयांपर्यंत वाढू शकतो. बहुतेक तज्ञांचा असा विश्वास आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 41000 ते 51480 रुपये असू शकतो. यामध्ये शिपाई ते शिक्षक, आयएएस पर्यंत सर्वांचे पगार वाढतील.

कोणाला मिळणार लाभ

1. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन रचना, भत्ते आणि इतर फायदे निश्चित करण्यात वेतन आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो आणि त्याच्या शिफारशी देशभरातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांवर लक्षणीय परिणाम करतात.

2. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे 49 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना साधारणपणे दर दशकात एकदा केली जाते, ज्यामुळे महागाईसह विविध आर्थिक निर्देशकांचा विचार करुन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतनश्रेणी, भत्ते, लाभांचे मूल्यांकन आणि सुधारणा सुचवल्या जातात.

1947 पासून सरकारने सात वेतन आयोगांची स्थापना केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना, फायदे आणि भत्ते ठरवण्यात वेतन आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो. बहुतेक सरकारी मालकीच्या संस्था आयोगाच्या शिफारशींचे पालन करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ‘रो-रो’ दुरुस्तीला !

Margao Crime: 'आईचे दागिने करायचे आहेत' म्हणत आला, हातोड्याने केला हल्ला; मडगाव प्रकरणातील संशयित बोलत होता कोकणी

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT