Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2023: यंदा शेतकऱ्यांव्यतिरिक्त 'या' लोकांना मिळणार पैसे, अर्थमंत्री करणार मोठी घोषणा!

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत.

दैनिक गोमन्तक

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. या सर्व परिस्थितीत सरकार यावेळी पीएलआय योजनेचा विस्तार करु शकते. सरकार आगामी अर्थसंकल्पात खेळणी, सायकल, चामडे आणि पादत्राणे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक सवलती जाहीर करु शकते.

निधी यापूर्वीच जारी करण्यात आला आहे

उच्च रोजगार असलेल्या क्षेत्रांना उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय योजना) योजनेचा लाभ देण्यासाठी याचा विस्तार केला जाऊ शकतो, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे. वाहने आणि वाहनांचे पार्ट, मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फार्मास्युटिकल्स, कापड, खाद्य उत्पादने, उच्च कार्यक्षमता सोलर पीव्ही मॉड्यूल्स, प्रगत रासायनिक सेल आणि स्टील यासह एकूण 14 क्षेत्रांमध्ये सरकारने (Government) सुमारे 2 लाख कोटी रुपयांची PLI योजना आधीच लागू केली आहे.

अर्थसंकल्पात जाहीर करता येईल

या क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादकांना स्पर्धात्मक आणि जागतिक बाजारपेठेत 'चॅम्पियन' बनवण्याचा या योजनेचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. खेळणी आणि चामड्यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी पीएलआय योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, तो अर्थसंकल्पात आणला जाण्याची शक्यता आहे.

हा पैसा अनेक क्षेत्रांवर खर्च केला जाऊ शकतो

या दोन लाख कोटी रुपयांपैकी काही रक्कम शिल्लक असल्याचे एका सूत्राने सांगितले. हे इतर क्षेत्रांमध्ये लागू केले जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT