Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यावेळी पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडून नोकरदार व्यावसायिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत अनेकांच्या अपेक्षा आहेत.
पण स्वतंत्र भारतात (India) आतापर्यंत सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर 1947 पासून सर्वाधिक वेळा देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. ते 13 मार्च 1958 ते 29 ऑगस्ट 1963 पर्यंत देशाचे अर्थमंत्री होते.
यानंतर 1967 ते 1969 या काळात ते दुसऱ्यांदा देशाचे अर्थमंत्री होते. यावेळी, त्यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले. मोरारजी देसाई यांनीही दोनदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी रोजी झाला. या कारणास्तव त्यांचा वाढदिवस चार वर्षांतून एकदा येतो. 1964 आणि 1968 मध्ये त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला अर्थसंकल्प सादर केला. वाढदिवसाला अर्थसंकल्प सादर करणे हा देखील एक विक्रमच आहे.
वास्तविक, यापूर्वी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला सादर केला जात होता. अर्थमंत्री असताना त्यांनी 6 वेळा आणि उपपंतप्रधान असताना 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला.
तसेच, अर्थमंत्री झाल्यानंतर मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्यानंतर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सर्वाधिक 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. 1996 ते 21 एप्रिल 1997 या काळात त्यांनी पहिल्यांदा अर्थमंत्रीपद भूषवले.
मे 1997 ते 19 मार्च 1998 पर्यंत ते इंद्रकुमार गुजराल यांच्या काळात अर्थमंत्रीही होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 मध्ये स्थापन झालेल्या UPA-1 आणि UPA-2 मध्ये त्यांना हेच मंत्रालय देण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.