Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1.
Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1. Dainik Gomantak.
अर्थविश्व

तुम्हीही Gmail वापरतायं? १ डिसेंबरपासून अशा युजर्सचं अकाउंट गुगल करणार बंद

Ashutosh Masgaunde

Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1:

आजच्या काळात गुगल अकाउंट असणे प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म वापरायचा असेल किंवा सोशल मीडियाचा कोणताही प्लॅटफॉर्म वापरायचा असेल, त्यासाठी गुगल अकाउंट किंवा जीमेल असणे बंधनकारक आहे.

सध्या फोनचा वापर करण्यासाठीही गुगल अकाउंट आवश्यक आहे. परंतु असे काही यूजर्स आहेत ज्यांनी त्यांचे Google अकाउंट तर आहे पण ते त्याचा वापरच करत नाहीयेत.

सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुमचे Google अकाउंट बऱ्याच काळापासून वापरले नसेल, तर तुमचे खाते 1 डिसेंबरला कंपीनी कायमस्वरुपी डिलीट करणार आहे.

गुगलने नुकतेच अब्जावधी यूजर्सची Gmail अकाउंट्स कायमस्वरुपी डिलीट केली आहेत. या दरम्यान, कंपनीने सांगितले की त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वापरात नसलेले अकाउंट्स डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.

गुगलच्या म्हणण्यानुसार, वापरात नसेलेले अकाउंट तसेच त्यात असलेला सर्व डेटा 1 डिसेंबरपासून डिलीट करण्यास सुरुवात होणार आहे.

गुगलकडून कोणत्याही अकाउंटवर कारवाई करण्यापूर्वी, यूजर्सना ईमेलद्वारे किंवा मेसेद्वारे आठवण करुन दिली जाईल.

जर तुमचे Google अकाउंट हटवले जाणार असेल, तर त्यापूर्वी कंपनीकडून तुम्हाला एक स्मरणपत्र नक्की पाठवले जाईल.

कारवाई टाळण्यासाठी काय करायचे?

  • दर दोन वर्षांनी किमान एकदा अकाउंट साइन इन करणे आवश्यक आहे.

  • अकाउंट सक्रिय ठेवण्यासाठी ईमेल वापरा.

  • Google Drive सुरु असल्याची खात्री करा.

  • गुगल अकाउंट लिंक असलेल्या यूट्युबवरून व्हिडीओ पाहा.

  • अॅप वेळोवेळी अपडेट करा.

  • गुगल सर्च वापरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT