Startup  Dainik Gomantak
अर्थविश्व

स्टार्टअप्समध्ये काम करणाऱ्यांचे अच्छे दिन!

काही स्टार्टअप्स असेही म्हणतात की या वर्षी टॉप परफॉर्मरला 75 टक्क्यापर्यंत पगारवाढ मिळू शकते.

दैनिक गोमन्तक

तुम्ही जर स्टार्टअपमध्ये काम करत तर तुमचे चांगले दिवस आले आहेत. अहवालानुसार, येत्या काही वर्षासाठी, कर्मचाऱ्यांना स्टार्टअपमध्ये (Startup) सर्वात अधिक पगारवाढ मिळेल. सरासरी ही वाढ 12-15 टक्यांच्या दरम्यान असेल, जी कोणत्याही क्षेत्रासाठी आणि उद्योगासाठी सर्वाधिक आहे. स्टार्टअप इकोसिस्टिम बळकट करण्यासाठी कुशल कर्मचाऱ्यांची गरज असते. ज्या कंपन्या प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने काम करत आहेत, कंपन्याना त्यांना त्याच्यासोबत कायम ठेवायचे आहे. त्या बदलत्या त्यांना चांगली वाढ दिली जाईल. टेक्नोलॉजी (Technology) कंपन्याना मोठ्या प्रमाणावर कुशल आणि हुशार कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे अहवालात म्हंटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनेक स्टार्टअप्सनी (Startup) त्यांच्या कर्मचाऱ्यांना सरासरी 15-25 टक्के पगारवाढ देणार असल्याचे म्हंटले आहे. जे टॉप परफॉर्मर्स आहेत, त्यांची वाढ आणखीनच जास्त होईल. डेलॉइट इंडियाचे आनंदरूप घोष म्हणाले की, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप खूप चांगले वेतन देत आहेत. चार-पाच वर्षापूर्वी स्टार्टअपमध्ये ज्या प्रकारचा पगार (Salary) दिला जात होता, तीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्या सरासरी पगारवाढ 12-15 टक्क्यांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

* एट्रीशन दर जास्त

एचआर सर्विस फर्म Aon India चे रुपक चौधरी म्हणतात की 2015 -16 च्या तुलनेत यावेळी अधिक पगारवाढ उपलब्ध असेल. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळच्या तुलनेत एट्रीशन दर जास्त आहे. अशावेळी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी आणखी वाढ करण्याची शक्यता आहे.

Shiprocket, Upgrad, Simplilearn, CredAvenue, Homelane, Nobroker आणि Cashkaro सारख्या स्टार्टअप्सनी ET ला स्पष्टपणे सांगितले आहे की यावर्षी पगारवाढ ही महामारीपूर्व पातळीपेक्षा जास्त असेल. काही स्टार्टअप्स असेही म्हणतात की या वर्षी टॉप परफॉर्मरला 75 टक्क्यापर्यंत पगारवाढ मिळू शकते. ज्यांचा पगार कमी आहे, त्यांना दुप्पट पगारही देऊ शकतो. याशिवाय अधिक बोनस, रिटेन्शन बोनस, टेन्युअर लिक्ड स्टॉक ऑप्शन (ESOP) ची सुविधाही दिली जात आहे.

36 बिलियन निधी जमा

खर तर, स्टार्टअप्सनी 2021 मध्ये 36 बिलियनचा विक्रमी निधी गोळा केला. यामुळे निधीची कमतरता नाही, परंतु या स्टार्टअप्सना कार्य करण्यासाठी कुशल आणि प्रतिभावान कामगारांची गरज आहे. यामुळेच चांगल्या कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी कंपन्या अशी प्रलोभन देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT