Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांइतका पगार! सरकारने दिला आदेश

UP Cabinet Contract Employees: केंद्र आणि राज्य सरकारकडून मार्चमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission Salary Hike: केंद्र आणि राज्य सरकारकडून मार्चमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाणार आहे. यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

मात्र याच दरम्यान सरकारी कंत्राटी कामगारांसाठी मोठी बातमी आली आहे. तुम्ही स्वत: किंवा तुमच्या कुटुंबात कोणी कंत्राटावर काम करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या कंत्राटी कामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सध्या सहाव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो

उत्तर प्रदेश सरकारने (Government) जारी केलेल्या आदेशानुसार, विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले सर्व कर्मचारी, ज्यांची भरती सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर जारी केलेल्या जाहिरातीच्या आधारे करण्यात आली आहे, त्यांना सरकार किमान वेतन देईल.

आतापर्यंत या कंत्राटी कामगारांना सहाव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन मिळत होते. राज्यात अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या 2150 आहे. कर्मचाऱ्यांच्या (Employees) हितासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारवर दरवर्षी 29 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

एक समिती स्थापन करण्यात आली

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी दिली. माहिती देताना ते म्हणाले की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन देण्याची शिफारस केली होती. यातील बहुतांश कंत्राटी कर्मचारी आरोग्य, पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT