मडगाव: टीसीपी कायद्यातील ३९ (अ) कलम रद्द करा, अशी मागणी करण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सासष्टीतील लोकांना घेऊन जाणाऱ्या बसेस पोलिसांनी ठिकठिकाणी अडविल्याने काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी सासष्टीत भर दिवसा नाकाबंदी तर केली होती.
पोलिसांनी बसेस अडविल्याने आज कुडतरी आणि बाणावली येथे लोकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. कुंकळ्ळी आणि चांदर भागातून येणाऱ्या बसेस पोलिसांनी अडविल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर पोलिसांनी या बसेस सोडल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.