7th Pay Commission DA Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, DA Hike वर आली मोठी अपडेट

DA Hike Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्थ मंत्रालयाने मोठी बातमी दिली आहे. ज्या क्षणाची केंद्रीय कर्मचारी खूप दिवसांपासून वाट पाहत होते, तो क्षण आला आहे.

Manish Jadhav

DA Hike Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्थ मंत्रालयाने मोठी बातमी दिली आहे. ज्या क्षणाची केंद्रीय कर्मचारी खूप दिवसांपासून वाट पाहत होते, तो क्षण आला आहे.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याला सरकारने मान्यता दिली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या पगारात नवीन महागाई भत्ता जोडला जाणार आहे.

महागाई भत्त्याची (DA) सुधारित अधिसूचना अर्थ मंत्रालयाने जारी केली आहे. यावेळी मोदी सरकारच्या वतीने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यासह ते 42% पर्यंत वाढले आहे.

डीए 38 वरुन 42 टक्के झाला

वित्त मंत्रालयाने सोमवारी डीएमध्ये 4% वाढ करण्यासाठी कार्यालयीन निवेदन जारी केले आहे. 24 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला मंजुरी दिली होती. यासोबतच कर्मचाऱ्यांचा (Employees) महागाई भत्ता 38 वरुन 42 टक्के झाला आहे. आता 3 एप्रिल रोजी त्याची अधिसूचना अर्थ मंत्रालयाने जारी केली आहे.

तुम्हाला तीन महिन्यांची थकबाकीही मिळेल

अधिसूचनेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या पगारात चार टक्के वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे. एप्रिलच्या पगारात तीन महिन्यांची थकबाकी असलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पगार दिला जाणार आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली आहे.

सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी ते मार्चपर्यंतची थकबाकी दिली जाणार आहे. यामुळे सरकारवर (Government) दरवर्षी 12,815 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

पेन्शनधारकांनाही भेट मिळाली

लाखो पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई सवलतीचा (डीआर हाइक) लाभही मिळाला आहे.

डीए वाढीबरोबरच मंत्रिमंडळाने महागाई रिलीफ (DA Hike) मध्ये 4 टक्के वाढ केली आहे. पेन्शनधारकांना 42% दराने महागाई सवलत दिली जाईल. पेन्शनधारकांच्या पेन्शनसोबत तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT