7th Pay Commission DA Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission DA Hike: सरकारच्या घोषणेपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, DA मध्ये होणार भरघोस वाढ!

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून डीएमध्ये वाढ होणार आहे. मात्र, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सरकारकडून त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून डीएमध्ये वाढ होणार आहे. मात्र, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सरकारकडून त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे.

वास्तविक, एआयसीपीआय निर्देशांकाची एप्रिल महिन्यापर्यंतची आकडेवारी आली आहे. मे आणि जूनच्या आकडेवारीच्या आधारेच मंत्रिमंडळाकडून (Cabinet) पुढील डीए जाहीर केला जाईल.

परंतु जुलै 2023 पासून लागू होणारा महागाई भत्ता माहीत आहे. आता हे निश्चित झाले आहे की, यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल.

डीएचा आकडा 46 टक्क्यांच्या पुढे जाईल

दरम्यान, त्याचे एक सूत्र ज्ञात आहे. या आधारे केलेल्या मोजणीतून स्पष्ट झाले आहे की, यावेळी डीएमध्ये निश्चित 4 टक्के वाढ होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, किंमत निर्देशांकाच्या प्रमाणात ज्या प्रकारे मूव्हमेंट होत आहे, त्यावरुन डीए 42 टक्क्यांवरुन 46 टक्क्यांपर्यंत वाढताना दिसत आहे.

आता एप्रिलचे आकडे आले आहेत. AICPI निर्देशांक 134.2 अंकांवर पोहोचला आहे. याशिवाय, डीए स्कोअर 45.06 आहे. पुढील दोन महिन्यांत निर्देशांक 46.40 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचा अर्थ DA मध्ये 4% वाढ निश्चित आहे.

डिसेंबरमध्ये AICPI निर्देशांक 132.3 अंकांवर होता

डिसेंबर 2023 मध्ये AICPI निर्देशांकाचा आकडा 132.3 अंक होता, ज्यामुळे DA स्कोअर 42.37 टक्के झाला. जानेवारीमध्ये जेव्हा निर्देशांक 132.8 वर पोहोचला तेव्हा DA स्कोअर 43.08 पर्यंत वाढला, याचा अर्थ 0.71 अंकांची ग्रोथ होती.

यानंतर फेब्रुवारी महिन्यात डीएमध्ये 0.71 अंकांची वाढ झाली होती. मार्चमध्ये हा आकडा 0.67 आणि एप्रिलमध्ये 0.60 इतका होता. जर आपण सरासरी आकडेवारी पाहिली तर, निर्देशांक आणि DA मध्ये 0.6725 अंकांची ग्रोथ झाली आहे.

दुसरीकडे, वरील कॅल्क्युलेशननुसार बोलायचे झाल्यास, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पुन्हा 4 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढून 46 टक्के होणार आहे.

त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये केली जाईल परंतु त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून होईल. 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pensioners) त्याची थकबाकी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT