Goa Petrol-Diesel Prices 09 November 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दर जैसे थे; जाणून घ्या किंमती

इस्रायल-हमाय युद्धामुळे तेल उत्पादक आखाती राष्ट्रांमध्ये तणाव

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Prices 09 November 2023: तेल कंपन्यांनी गुरूवारी 09 नोव्हेंबर रोजी देशातील पेट्रोलियम उत्पादनांचे दर जाहीर केले. त्यानुसार गोव्यातील उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि पणजी येथील पेट्रोल-डीझेल दर जैसे थे राहिले आहेत.

तथापि, देशातील काही शहरांमध्ये व्हॅट, कमिशन यामुळे दरांमध्ये किरकोळ फरक पाहण्यास मिळू शकतो. इस्त्रायल-हमास युद्धाचा परिणाम आखातातील देशांवर थेटपणे होत असल्याने त्यामुळे आखातातील तेल उत्पादक देशांमध्ये तणाव आहे.

त्याचा परिणाम तेल उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतींवर दबाव असल्याचे बोलले जाते.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट

आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Goa Eco Sensitive Zone: ‘जैव संवेदनशील’ क्षेत्रांची पाहणी आजपासून; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, डॉ. पांडेही होणार सहभागी

Goa Cabinet: फडणवीस कि पुन्हा शिंदे? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पेचामुळे गोवा मंत्रिमंडळातील बदल खोळंबला

Tanvi Vasta Arrest: 'तन्‍वी' प्रकरणाची व्याप्ती 'मोठी'! आणखी दोन तक्रारी दाखल; Social Media वरची पोस्ट चर्चेत

Rashi Bhavishya 27 November 2024: आज 'या' धनलाभ होण्याची शक्यता आहे, ती रास तुमची तर नाही ना?

SCROLL FOR NEXT