Global Market Effect on Share Market Sensex pull down by 500 points Dainik Gomantak
अर्थविश्व

जागतिक बाजाराचा परिणाम,सेन्सेक्ससह बँक निफ्टीही घसरला

सेन्सेक्स (Sensex) बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात 500 अंकांनी घसरला आहे . 30 शेअर्सचा सेन्सेक्स 501.74 अंकांनी घसरत 59,165.86 वर पोहोचला होता.

दैनिक गोमन्तक

जागतिक बाजारात होत असलेली प्रचंड विक्री आणि एचडीएफसी बँक(HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Banks) आणि इन्फोसिसमधील तोटा यामुळे सेन्सेक्स (Sensex) बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात 500 अंकांनी घसरला आहे . 30 शेअर्सचा सेन्सेक्स 501.74 अंकांनी घसरत 59,165.86 वर पोहोचला होता. त्याचप्रमाणे निफ्टी (Nifty) 17613.55 वर पोहोचला आहे.(Global Market Effect on Share Market Sensex pull down by 500 points)

एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये बुधवारी तोटा झालेला पाहायला मिळत आहे , तर सोमवारी या शेअर्समध्ये वाढ झाली होती . एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सकारात्मक जागतिक बाजारपेठेत वाढ झाल्याने सेन्सेक्सने सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात 200 अंकांची वाढ केली. पण बुधवारी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि सेन्सेक्सही मोठ्या तोट्यात आला आहे.

आज आयसीआयसीआय बँक सेन्सेक्समध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन टक्क्यांनी घसरली आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, मारुती, बजाज ऑटो, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण पहायला मिळत आहे . मागील सत्रात, BSE चा शेअर निर्देशांक 410.28 अंकांनी 59,667.60 वर आणि निफ्टी 106.50 अंकांनी घसरून 17,748.60 वर व्यवहार करत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांनी खाली येत भारती एअरटेल हि कंपनी सर्वात मोठा तोटा सहन करताना पाहायला मिळाली . याशिवाय टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एचसीएल टेक आणि इन्फोसिस या कंपन्यांनाहि मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT