Aditya Birla Sun Life चा IPO आज बाजारात, 712 रुपयांपर्यंत प्राइज बँड

Aditya Birla Sun Life Amc IPO साठी 695 ते 712 रुपयांपर्यंत प्राइस बँड ठेवण्यात आला आहे.
Aditya Birla Sun Life Amc IPO will launch today
Aditya Birla Sun Life Amc IPO will launch today Dainik Gomantak
Published on
Updated on

Aditya Birla Sun Life AMC IPO 29 सप्टेंबरला म्हणजेच आजच्या दिवशी सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहे. हा IPO 1 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे . अलीकडेच, कंपनीला सेबी कडून प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच IPO साठी मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक ऑफर (IPO) साठी मंजुरी मिळाली आहे. कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपात आहे. कंपनीचे दोन प्रवर्तक आदित्य बिर्ला कॅपिटल आणि सन लाईफ एएमसी इन्व्हेस्टमेंट्स मालमत्ता व्यवस्थापन फर्म मधील आपला हिस्सा काढून घेतील. यासाठी 695 ते 712 रुपयांपर्यंत प्राइस बँड ठेवण्यात आला आहे.

या IPO मध्ये गुंतवणूक करण्याबाबत, बहुतेक ब्रोकरेज हाऊसचे मत आहे की गुंतवणूकदाराने त्यात पैसे गुंतवावेत. आनंद राठी, बीपी इक्विटीज, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडसह अनेक ब्रोकरेज हाऊस यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.

ज्यांना हे शेअर्स घ्यायचे आहेत ते गुंतवणूकदार 20 शेअर्स किंवा जास्तीत जास्त 280 शेअर्स विकत घेऊ शकतात . आदित्य बिर्ला कॅपिटल ग्रुप या 3.88 कोटी शेअर्स IPO अंतर्गत 28.51 लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर देईल. दुसरीकडे, सन लाईफ एएमसी 3.6 कोटी शेअर्सची विक्री ऑफर करेल.

Aditya Birla Sun Life Amc IPO will launch today
एक ऑक्टोबरपासून होणार महत्वाचे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

IPO BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे गुंतवणूक व्यवस्थापक आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड, आदित्य बिर्ला ग्रुप आणि कॅनडाच्या सन लाइफ फायनान्शियल इंक यांच्यात हि संयुक्त योजना असणार आहे .

कंपनीचे दोन प्रवर्तक आदित्य बिर्ला कॅपिटल आणि सन लाईफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट्स मालमत्ता व्यवस्थापन फर्म (एएमसी) मधील आपला हिस्सा काढून घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com