Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Bloomberg Billionaires Index: दिवाळीपूर्वी गौतम अदानी यांना मोठा झटका, अब्जाधीशांच्या टॉप-20 मधून बाहेर!

Manish Jadhav

Billionaire List 2023: वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदानी यांना मोठा झटका बसला होता.

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023) मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले गौतम अदानी आता ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या इंडेक्समध्ये मागे पडले आहेत.

जगातील अब्जाधीशांमध्ये सुरु असलेल्या चढा-ओढीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना दिवाळीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. ते जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत टॉप-20 मधून बाहेर पडले आहेत.

लॅरी एलिसन पाचव्या स्थानावर आहे

दरम्यान, या यादीत बिल गेट्स चौथ्या स्थानावर तर लॅरी एलिसन पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने जारी केलेल्या यादीनुसार, गौतम अदानी (Gautam Adani) यांची संपत्ती $63 अब्ज आहे आणि ते 21 व्या स्थानावर आहेत.

त्यांच्या खाली, झोंग शानशान $62.8 अब्ज संपत्तीसह 22 व्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानींनंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी दुसऱ्या स्थानावर आणि झोंग शानशान तिसऱ्या स्थानावर आहेत.

अशाप्रकारे, आशियातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टॉप-20 मधून बाहेर पडले आहेत.

एलन मस्क 241 अब्ज डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर आहेत

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क (Elon Musk) 241 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. या वर्षात आतापर्यंत त्यांनी 104 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. तर गौतम अदानी यांची सर्वाधिक संपत्ती 57.6 अब्ज डॉलर्सची झाली आहे.

अशा प्रकारे, संपत्ती गमावलेल्या अब्जाधीशांमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहेत. मार्क झुकेरबर्गने या वर्षात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक संपत्ती $71 अब्ज इतकी कमावली आहे. पण ते 117 अब्ज डॉलर्ससह जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.

बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती $169 अब्ज आहे

बर्नार्ड अर्नॉल्ट जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती $169 अब्ज आहे. जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 153 अब्ज डॉलर्स आहे. चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स यांची संपत्ती 125 अब्ज डॉलर्स आहे.

पाचव्या स्थानावर पोहोचलेल्या लॅरी एलिसनची संपत्ती 125 अब्ज डॉलर आहे. तर लॅरी पेज 123 अब्ज डॉलर्ससह सहाव्या स्थानावर आहे.

सर्जी ब्रिन 117 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत. यानंतर मार्क झुकरबर्ग आठव्या क्रमांकावर आहे, त्यांच्याकडेही 117 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT