Forbes Billionaires List: 'या' चार भारतीय महिला उद्योजकांची गरडझेप, फोब्सच्या यादीत मिळवले स्थान

Forbes List: भारतीय वंशाच्या महिला जगभरात आपले नाव कमावत आहेत. फोर्ब्सने 100 श्रीमंत महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या चार महिलांनाही स्थान दिले आहे.
Indian Women Entrepreneurs
Indian Women EntrepreneursDainik Gomantak
Published on
Updated on

Forbes List: भारतीय वंशाच्या महिला जगभरात आपले नाव कमावत आहेत. फोर्ब्सने 100 श्रीमंत महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या चार महिलांनाही स्थान दिले आहे. या चौघींची एकत्रित संपत्ती 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

फोर्ब्सच्या यादीत संगणक नेटवर्किंग फर्म अरिस्ता नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि सीईओ जयश्री उल्लाल, आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग फर्म सिंटेलच्या सह-संस्थापक नीरजा सेठी, क्लाउड कंपनी कॉन्फ्लुएंटच्या सह-संस्थापक आणि माजी सीटीओ नेहा नारखेडे आणि पेप्सिकोचे सीईओ इंद्रा नूयी यांचाही समावेश आहे.

शेअर बाजारातील (Stock Market) वाढीदरम्यान, फोर्ब्सच्या 100 श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महिला व्यावसायिकांच्या एकूण संपत्तीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची मालमत्ता $ 124 अब्ज एवढी झाली आहे.

Indian Women Entrepreneurs
Forbes' Global 2000 List: फोर्ब्सची नवी यादी जाहीर, रिलायन्सची गरुडझेप; अदानींच्या कंपन्यांचीही ग्रॅंड एन्ट्री!

जयश्री उल्लाल निव्वळ संपत्ती

Arista Networks च्या अध्यक्ष आणि CEO जयश्री उल्लाल या यादीत 15 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.4 अब्ज डॉलर आहे. 2008 पासून त्या अरिस्ता नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

Arista Networks च्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 मध्ये $4.4 बिलियनची कमाई केली. जयश्री उल्लाल या क्लाउड कॉम्प्युटिंग कंपनी स्नोफ्लेकच्या संचालक मंडळावरही आहेत.

नीरजा सेठी 25 व्या स्थानावर पोहोचल्या

दरम्यान, या यादीत नीरजा सेठी 25 व्या क्रमांकावर आहेत. ज्यांची एकूण संपत्ती 99 दशलक्ष डॉलर्स आहे. सेठी आणि त्यांचे पती भरत देसाई यांनी 1980 मध्ये सह स्थापन केलेली, सिंटेल फ्रेंच IT फर्म Atos SE ने ऑक्टोबर 2018 मध्ये $3.4 अब्जांना विकत घेतली.

सेठी यांना अंदाजे $510 दशलक्ष शेअर (Share) मिळाले. दुसरीकडे, 38 वर्षीय नेहा नारखेडे, क्लाउड कंपनी कॉन्फ्लुएंटच्या सह-संस्थापक आणि माजी CTO, $520 दशलक्ष संपत्तीसह यादीत 38 व्या स्थानावर आहेत.

Indian Women Entrepreneurs
Forbes Billionaires List 2023: भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला, सावित्री जिंदाल ते फाल्गुनी नायर; जाणून घ्या

इंद्रा नूयी यांच्याकडे किती संपत्ती आहे?

PepsiCo चे माजी अध्यक्ष आणि CEO इंद्रा नूयी 24 वर्षे कंपनीसोबत राहिल्यानंतर 2019 मध्ये निवृत्त झाल्या. त्यांची एकूण संपत्ती $350 दशलक्ष आहे. त्या या यादीत 77 व्या स्थानावर आहेत.

ABC सप्लायचे सह-संस्थापक डॅन हेंड्रिक्स यांनी सलग सहाव्यांदा या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. हेंड्रिक्स यांची एकूण संपत्ती $15 अब्ज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com