Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

गौतम अदानींची मोठी डील: फ्रेंच ऊर्जा कंपनी करणार अदानी समूहात गुंतवणूक

फ्रेंच ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज टोटल एनर्जी अदानी समूहाच्या ग्रीन हायड्रोजन इंडस्ट्रीजमधील 25 टक्के भागभांडवल विकत घेणार आहे.

दैनिक गोमन्तक

फ्रेंच ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज टोटल एनर्जी अदानी समूहाच्या ग्रीन हायड्रोजन इंडस्ट्रीजमधील 25 टक्के भागभांडवल विकत घेणार आहे. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमची संयुक्तपणे उभारणी करण्यासाठी फ्रेंच कंपनीसोबत नवीन भागीदारी केली आहे. "या धोरणात्मक करारामध्ये, Total Energy अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) कडून अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) मधील 25 टक्के भागभांडवल विकत घेईल," असे निवेदनात म्हटले आहे. या डीलची बातमी येताच अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. BSE वर कंपनीचे शेअर्स 5.43% वाढून 2194.40 रुपयांवर पोहोचले. (france total to buy 25 percent stake in adani new industries ltd check details)

अदानी समूहाचे लक्ष्य काय आहे

अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडचे पुढील 10 वर्षांत ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्याशी संबंधित इकोसिस्टममध्ये USD 50 बिलियनपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, ANIL 2030 पूर्वी दरवर्षी 1 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करेल. ANIL मधील या गुंतवणुकीमुळे, अदानी समूह आणि TotalEnergies यांच्यातील धोरणात्मक भागीदारीमध्ये आता LNG टर्मिनल्स, गॅस युटिलिटी व्यवसाय आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादन यांचा समावेश आहे.

काय म्हणाले गौतम अदानी?

गौतम अदानी (Gautam Adani) म्हणाले, "जगातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लेयर बनण्याच्या आमच्या प्रवासात, टोटल एनर्जीसोबतची भागीदारी अनेक आयामांना जोडते. R&D, बाजारपेठेतील प्रवेश आणि अंतिम ग्राहकाची समज यांचा समावेश आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT