7 Percent Interest On 3 Year FDS For Senior Citizen Dainik
अर्थविश्व

'या' चार बॅंका ज्येष्ठ नागरिकांना देतात 3 वर्षांसाठी FD वर 7 टक्के व्याज

महामारीच्या काळात व्याजदर घसरत असतानाही, छोट्या खाजगी बँका तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.

दैनिक गोमन्तक

मुदत ठेव गुंतवणूक ज्येष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने यावेळीही रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्याची घोषणा केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँक सारख्या बँकांनी एफडीवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. कोविड-19 (COVID-19) महामारीच्या काळात व्याजदर घसरत असतानाही, छोट्या खाजगी बँका तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. चला अशा चार बँकांबद्दल जाणून घेऊया, ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. (7 Percent Interest On 3 Year FDS For Senior Citizen)

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), आरबीआयची उपकंपनी, मुदत ठेवींवर गुंतवलेल्या रकमेवर म्हणजे 5 लाखांपर्यंतच्या FD वर हमी देते.

इंडसइंड बँक

खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँक (IndusInd Bank) 2 वर्ष ते 61 महिन्यांत मैच्योर होणाऱ्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याज देत आहे. हे दर 16 फेब्रुवारी 2022 पासून लागू आहेत.

आरबीएल बँक

RBL बँक 24 महिने ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मैच्योर होणाऱ्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याज देते. हे दर 3 फेब्रुवारी 2022 पासून लागू आहेत. 24 महिन्यांपासून ते 36 महिन्यांपेक्षा कमी, व्याज दर 7 टक्के आहे.

येस बँक (Yes Bank)

खासगी क्षेत्रातील येस बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देते. हे दर 4 जानेवारी 2022 पासून लागू आहेत.

बंधन बँक (Bandhan Bank)

बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देते. हे दर 12 जानेवारी 2022 पासून लागू आहेत. बँक 2 वर्षे आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहे.

बँक बुडली तरी पैसे बुडणार नाहीत

भविष्यात बँक बुडल्यास ठेवीदारांना कोणतीही अडचण येणार नाही. बँक बुडाली तरी त्यांना त्यांचे पैसे 3 महिन्यांत परत मिळतील. DICGC, भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी, बँक ठेवींवर विमा संरक्षण प्रदान करते. DICGC बँकांमधील बचत, चालू, आवर्ती खाते किंवा मुदत ठेव (FD) इत्यादी योजनांमध्ये रु. 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित करते.

जर एखादी बँक डिफॉल्टर झाली, तर DICGC त्याच्या प्रत्येक ठेवीदाराला मुद्दल रक्कम आणि व्याजासह कमाल 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम देईल. केंद्र सरकारने बँक बुडवल्यास, ग्राहकांना 90 दिवसांच्या आत बँक (Bank) ठेवींवर 5 लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

SCROLL FOR NEXT