plane Dainik Gomantak
अर्थविश्व

परदेशी प्रवास होणार स्वस्त! देशांतर्गत विमान कंपन्यांना एटीएफ उत्पादन शुल्कात सवलत

आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणे स्वस्त होणार आहे.

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणे स्वस्त होणार आहे. खरेतर, वित्त मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांना तेल विपणन कंपन्यांकडून विमान इंधन म्हणजेच एटीएफ खरेदीवरती 11 टक्के मूलभूत उत्पादन शुल्कामधून दिलासा दिला आहे. (Foreign travel will be cheaper Concession in ATF excise duty to domestic airlines)

उत्पादन शुल्कातून सवलत 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली,

मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले की आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेण्यासाठी देशांतर्गत विमान कंपन्यांना विकल्या जाणार्‍या एटीएफवर मूलभूत उत्पादन शुल्क आकारले जाणार नाहीये. हा निर्णय 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आला आहे.

सरकारने 1 जुलै रोजी विमान इंधनाच्या निर्यातीवर 6 रुपये प्रति लिटर दराने विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू करण्याची घोषणा देखील केली होती. त्यानंतर हे शुल्क आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांना लागू होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती.

एटीएफ निर्यातीवर उत्पादन शुल्क आकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे असलेल्या देशांतर्गत विमान कंपन्यांना 11 टक्के दराने मूलभूत उत्पादन शुल्क भरावे लागेल, असे तेल विपणन कंपन्यांनी मत मांडले होते. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी देशांतर्गत विमान कंपन्यांवर हे उत्पादन शुल्क लागू होणार नाहीये, असे स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिले. ही व्यवस्था विदेशी विमान कंपन्यांना उत्पादन शुल्कात दिलेल्या सूटच्या अनुषंगाने असणार आहे.

एअरलाइन उद्योगासाठी स्वागतार्ह पाऊल

अभिषेक जैन, कर भागीदार, KPMG, म्हणाले की, “सरकारने परदेशी जाणाऱ्या विमानांसाठी विमान इंधनावर उत्पादन शुल्क लादण्यापासून दिलासा दिला आहे. विमान उद्योगासाठी हे स्वागतार्ह पाऊल असणार आहे.

गेल्या महिन्यामध्येच एटीएफच्या किमती 16 टक्क्यांनी वाढल्या होत्या. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय राजधानीत ATF ची किंमत 1,41,232.87 रुपये प्रति किलोलीटर (141.2 प्रति लिटर) प्रति किलोलीटर किंवा 16.26 टक्के वाढीसह 19,757.13 रुपये एवढी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT