Forbe's Billionaires List 2023: अब्जाधीश महिलांच्या यादीत देशातील कोणत्या महिला आहेत हे तुम्हाला माहितीये का? पुरुष अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे नाव कायम आहे.
दुसरीकडे, महिलांबद्दल बोलायचे झाल्यास, या यादीत सावित्री जिंदाल यांनी बाजी मारली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्या सहाव्या क्रमांकावर आहेत, तर महिलांच्या यादीत त्या पहिल्या क्रमांकावर आहेत. चला तर मग देशातील अब्जाधीश महिलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
देशातील अब्जाधीश महिलांच्या यादीत अनेक दिग्गज महिलांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये किरण मुझुमदार शॉ, सावित्री जिंदाल, रोशनी नाडर यांच्यासह अनेक महिलांचा (Women) समावेश आहे.
फोर्ब्सच्या यादीत कोणत्या महिला कोणत्या स्थानावर आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
या यादीत 73 वर्षीय सावित्री जिंदाल यांच्या नावाचा समावेश आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत त्या 94 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 17 अब्ज डॉलर्स आहे.
सावित्री जिंदाल यांचा विवाह जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओमप्रकाश जिंदाल यांच्याशी झाला. स्टीलसह अनेक क्षेत्रांवर त्यांचे लक्ष होते. 2005 मध्ये ओपी जिंदाल यांच्या निधनानंतर संपूर्ण व्यवसाय सावित्री जिंदाल यांच्याकडे आला.
राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांची संपत्ती सुमारे $5.9 अब्ज किंवा 47,650.76 कोटी रुपये एवढी आहे.
या यादीत त्या 30 व्या स्थानावर कायम आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या शेअर्सच्या यादीत टायटन, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँड्सच्या नावांचाही समावेश आहे.
फाल्गुनी नायर यांचे नाव सर्वांना माहिती असेलच. नुकतेच Nykaa ने त्याचे शेअर्स बाजारात लिस्ट केले आहेत.
Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर या देखील देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.
रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे $2.7 बिलियन किंवा 22,192 कोटी रुपये आहे. फाल्गुनी नायर यांच्याकडे Nykaa चा अर्धा हिस्सा आहे. ही कंपनी 2012 मध्ये सुरु झाली. सध्या त्या जवळपास 1600 लोकांच्या टीमसोबत काम करत आहेत.
याशिवाय, फार्मा क्षेत्रातील कंपनी बायोकॉनचे चेअरपर्सन किरण मुझुमदार-शॉ यांचेही नाव या यादीत आहे. देशाच्या श्रीमंत महिलांमध्ये त्यांचे नाव बऱ्याच काळापासून समाविष्ट होते.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती सध्या सुमारे $2 अब्ज किंवा 16,438 कोटी रुपये आहे. बायोकॉनची सुरुवात 1978 साली झाली. फोर्ब्सच्या अहवालात त्यांचे स्थान 68 वे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.