Forbes List: फोर्ब्सच्या 20 आशियाई महिला बिझनेस वुमनच्या यादीत 'तीन भारतीय महिला'

Forbes List of Asia Power Businesswomen: फोर्ब्सच्या 20 आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत भारतातील तीन महिलांना स्थान मिळाले आहे.
Forbes List of Asia Power Businesswomen
Forbes List of Asia Power BusinesswomenDainik Gomantak

फोर्ब्स वेळोवेळी देशातील आणि जगातील सर्वात श्रीमंत किंवा सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जारी करत असते, ज्यामध्ये स्थान मिळवणे ही मोठी गोष्ट आहे. आता फोर्ब्सच्या 20 आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश झाला आहे. फोर्ब्सच्या नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित झालेल्या या यादीमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये व्यवसाय वाढवण्यात उल्लेखनीय यश मिळविलेल्या महिलांचा समावेश आहे.

  • कोणाचा समावेश आहे?

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या अध्यक्षा सोमा मंडल, एमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालक नमिता थापर आणि होन्सा कंझ्युमरचे को-फाउंडर आणि मुख्य नवोपक्रम अधिकारी गजल अलघ यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत .

  • जाणून घ्या फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवलेल्या तीन भारतीय महिलांबद्दल

  • सोमा मंडळ

सोमा मंडल या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी 1 जानेवारी 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे. सोमा मंडल या सेलच्या पहिल्या महिला कार्यकारी संचालक तसेच पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. कोरोनामध्ये (Corona) आर्थिक मंदी असूनही कंपनीमध्ये सातत्य आहे. सोमा मंडळ कंपनीच्या अनेक उत्पादनांच्या ब्रँडिंगला प्रोत्साहन देण्याची काळजी घेते.

  • नमिता थापर

नमिता थापर ही एक भारतीय उद्योजक आहे. ती भारतातील मल्टिनॅशनल फार्मसी कंपनी (Emcure) फार्मास्युटिकल्सची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. याशिवाय ती प्रसिद्ध टेलिव्हिजन बिझनेस रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया सीझन 1' ची जजही राहिली आहे. नमिता थापर ही कॉर्पोरेट जगतातील एक मोठी व्यक्ती आहे.

  • गझल अलग

गझल अलग या भारतीय उद्योगपती, उद्योगपती आणि कॉर्पोरेट आहे. मामा अर्थ या प्रसिद्ध ब्युटी ब्रँडची त्या को-फाउंडर आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन बिझनेस रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया सीझन 1' ची जज म्हणूनही तिने आपले कौशल्य दाखवले आहे.

  • कोणत्या देशातील महिलांचा यादीत समावेश

फोर्ब्सने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, यादीतील काही महिला शिपिंग, रिअल इस्टेट आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रात काम करत आहेत, तर काही तंत्रज्ञान, औषध आणि कमोडिटीसारख्या इतर क्षेत्रात इनोव्हेशन करत आहे. यादीतील इतर महिला ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान आणि थायलंडमधील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com