Indian Billionaires: भारतातील अनेक अब्जाधीशांनी सोडले नागरिकत्व, वाचा कारण

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार 2022 मध्ये 2 लाख 25 हजार भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.
Indian Billionaires
Indian BillionairesDainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील बहुतेक श्रीमंत लोक देश सोडून जात आहेत. यासाठी अब्जाधीष जो मार्ग अवलंबत आहेत त्याला रेसिडेन्स बाय इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. भारतीय नागरिकत्व सोडलेल्या या श्रीमंत लोकांना HNIs किंवा Dollar Millionaires असे म्हटले जाते.

रेसिडेन्स बाय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हाय नेट वर्थ इंडिव्हिजुअल असलेली व्यक्ती होण्यासाठी किती मालमत्तेची आवश्यकता आहे आणि कोणत्या कारणांमुळे हे लोक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत याचे कारण जाणून घेउया.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. 2011 ते 2022 पर्यंत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ही आकडेवारी 9 फेब्रुवारी रोजी संसदेत देशासमोर ठेवण्यात आली होती. 

  • भारत सोडण्याचे हेच प्रमुख कारण आहे

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या कारणांमुळे हे लोक भारत (India) डून जात आहेत त्यात चांगल्या संधींपासून ते आरोग्यसेवा, जीवनाचा दर्जा आणि उत्तम शिक्षण यासारख्या संधींचा समावेश आहे. 

याशिवाय अनेक कारणांमुळे हे लोक देश सोडून जात आहेत. अशाच एका केस स्टडीमध्ये एका कुटुंबाने सांगितले की ते 2019 मध्ये कॅनडाला गेले होते आणि 2022 मध्ये त्यांनी कॅनडाच्या कायमस्वरूपी रहिवाशासाठी अर्ज केला होता. यामागचे कारण सांगताना या कुटुंबाने सांगितले की, आपल्या मुलाची शाळा वारंवार बदलणे त्यांना योग्य वाटत नाही. याशिवाय आणखी एक धक्कादायक बाबही त्यांनी सांगितली.

ते म्हणाले की जेव्हा ते दिल्लीत राहत होते, तेव्हा त्यांच्या मुलीला खराब हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. पण प्रदूषित दिल्लीच्या तुलनेत कॅनडातील शहराची हवा स्वच्छ आणि श्वास घेण्यायोग्य आहे. 

तेथे गेल्यानंतर त्यांच्या मुलीने कधीही श्वास घेण्यास त्रास होत नसल्याची तक्रार केली. यामुळे हे देखील कायमस्वरूपी रहिवासीसाठी अर्ज करण्याचे एक कारण बनले. पाच वर्षांनी कायमस्वरूपी रहिवाशासाठी एकदा अर्ज केल्यानंतर, अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर, कॅनेडियन नागरिकत्व देखील उपलब्ध आहे.

Indian Billionaires
Sidu Moose wala Murder case: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील दोघा संशयितांचा तुरूंगात खून
  • एचएनआय  म्हणजे काय?

भारताचे नागरिकत्व सोडून देणाऱ्या अब्जाधीशांचा एचएनआय  (HNI) असे बोलले जाते. ज्यांची एकूण संपत्ती एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे अशा लोकांचा यामध्ये समावेश होतो. एक दशलक्ष डॉलर्स म्हणजे 8.2 कोटी रुपये. हेन्ली ग्लोबल सिटिझन्स रिपोर्टनुसार, भारतात या गटातील सुमारे 3 लाख 47 हजार लोक आहेत. हा आकडा डिसेंबर 2021 पर्यंतचा आहे. हे 3 लाख 47 हजार लोक भारतातील केवळ नऊ शहरांमधील आहेत. या शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) या शहरांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com