Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, तुम्हीही आनंदाने माराल उड्या

दैनिक गोमन्तक

Kisan Credit Card Update: केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पीएम किसान सन्मान निधी ही सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेचा लाभ 10 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी मोठी गोष्ट सांगितली आहे.

अर्थमंत्र्यांनी सुचवले

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांना उत्पन्न वाढवण्यासाठी सुलभ कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. या विषयावर अर्थमंत्र्यांनी अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) दीर्घ चर्चा केली. यावेळी, त्यांनी प्रादेशिक बँकांना ग्रामस्थांच्या मदतीसाठी बँकेचे (Bank) तंत्रज्ञान अद्ययावत करण्याची सूचनाही केली.

किसान क्रेडिट कार्ड योजनेवर चर्चा

या बैठकीनंतर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी बैठकीची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा (KCC योजना) आढावा घेतला. यावर त्यांनी विचारमंथन केले आणि शेतकर्‍यांना (Farmers) संस्थात्मक कर्ज कसे उपलब्ध करुन देता येईल हेही सुचवले.'

यानंतर, बैठकीला उपस्थित असलेले वित्त राज्यमंत्री भागवत के कराड म्हणाले की, "अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मासेमारी आणि दुग्ध व्यवसायात गुंतलेल्या लोकांना केसीसीच्या मुद्द्यावर चर्चा झाली.''

शिवाय, कृषी कर्जामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर या बैठकीत भर देण्यात आला. याशिवाय अन्य एका सत्रात प्रादेशिक ग्रामीण बँकांबाबत निर्णय घेण्यात आला की, प्रायोजक बँकांनी डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी मदत करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Devi Jatra 2024 : ‘लईराई’ जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात ; रविवारी अग्निदिव्य

Sasashti News : अपघातग्रस्त दुचाकीस्‍वाराला मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात

Polluted Water : प्रदूषित पाण्याची चाचणी; डोंगरीतील तिघांची प्रकृती बिघडली

S Jaishankar: ‘’जगात मोठी उलथापालथ होणार’’; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देशवासियांना दिला खास संदेश

Theft Case: दहा लाखांचे चोरीचे दागिने विकून गोव्यात अय्याशी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT