PM Kisan 12th Installment: जर तुम्ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या 12 व्या हप्त्याशी संबंधित माहिती समोर आली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होईल. 17 ऑक्टोबर रोजी भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR), पुसा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जारी करतील.
31 मे रोजी 11 वा हप्ता जारी करण्यात आला
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आयोजित केल्या जाणार्या कृषी-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलन 2022 दरम्यान पंतप्रधान मोदी काही शेतकऱ्यांना भेटू शकतात. यापूर्वी, पीएम किसान निधीचा 11 वा हप्ता सरकारने 31 मे रोजी जारी केला होता. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या योजनांमध्ये ही सरकारची (Government) सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे.
अशा शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये!
ई-केवायसी न करणाऱ्यांना या वेळी 12 व्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. तुम्ही तुमचे ई-केवायसी अद्याप पूर्ण केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. 31 मे 2022 रोजी कोणत्याही कारणास्तव तुम्हाला सरकारने जारी केलेले 2000 रुपये मिळाले नाहीत, तर यावेळी 17 ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात 4000 रुपये येतील.
ई-केवायसी आणि भौतिक पडताळणी
काही लोक चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडे येत होत्या. यानंतर सरकारने ई-केवायसी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन अनिवार्य केले होते. यानंतर राज्य शासनामार्फत पात्र शेतकऱ्यांची (Farmers) पडताळणी करण्यात आली. पडताळणीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच यावेळी 2000 रुपयांचा हप्ता पाठवला जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.