PM Kisan: पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी मोठा झटका! सरकारने बंद केली ही सुविधा

PM Kisan Latest Update: आता लवकरच 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
PM Kisan
PM Kisan Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 11व्या हप्त्याचे 2000 रुपये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. आता लवकरच 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

दरम्यान, सरकारने (Government) PM किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल केला आहे, ज्याचा परिणाम 12 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांवर होणार आहे. वास्तविक, आता शेतकऱ्यांकडून (Farmers) मोठी सुविधा हिरावून घेण्यात आली आहे. सरकारने काय बदलले ते जाणून घ्या.

PM Kisan
PM Kisan: आला रे 12 वा हप्ता! या तारखेला खात्यात येणार 4 हजार रुपये

पीएम किसानमध्ये मोठा बदल

केंद्र सरकारने (Central Government) पीएम किसान योजनेत मोठा बदल केला आहे. आता शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरुन त्यांचे स्टेटस तपासू शकणार नाहीत. त्यासाठी आता शेतकऱ्यांना स्टेटस तपासण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक झाले आहे. पूर्वी असा नियम होता की, शेतकरी आपला आधार किंवा मोबाईल क्रमांक टाकून त्यांचे स्टेटस तपासू शकत होते. यानंतर नियम आला की, शेतकरी मोबाईल नंबरवरुन नाही, तर आधार क्रमांकावरुन स्टेटस पाहू शकतील. आता नवीन नियमानुसार, शेतकऱ्यांना आधार क्रमांकावरुन स्टेटस पाहणे शक्य होणार नाही, त्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक असणार आहे.

त्याची प्रक्रिया जाणून घ्या

येथे डावीकडील लहान बॉक्समध्ये Beneficiary Status वर क्लिक करा.

आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.

येथे तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुमचं स्टटेस चेक करा.

तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास, तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या या लिंकवर क्लिक करुन.

PM Kisan
PM Kisan: मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, त्वरित करा अर्ज; जाणून घ्या

आता यामध्ये तुमच्या PM किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.

यानंतर, कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा.

दिलेल्या बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला OTP एंटर करा आणि Get Details वर क्लिक करा.

आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव तुमच्या समोर असेल.

PM Kisan
PM Kisan: आता पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेंतर्गत मिळणार 6000 रुपये! जाणून घ्या

पीएम किसान योजना म्हणजे काय?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते पाठवण्यात येतात. जर अद्याप तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले नाहीत, तर सर्वप्रथम तुमचे स्टेटस आणि बँक अकाऊंट तपासा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com