Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2023: करदात्यांच्या आनंदासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, 10 प्रकारे घेऊ शकता सूट...!

FM Nirmala Sitharaman: 2023 चा अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी करमुक्तीच्या हालचाली वाढत आहेत.

दैनिक गोमन्तक

FM Nirmala Sitharaman: 2023 चा अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी करमुक्तीच्या हालचाली वाढत आहेत. नोकरी व्यवसायाला यावेळी आयकर सवलतीच्या मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीमारामन यांनी करमुक्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, कमी उत्पन्न गटातील लोकांना कमी कर भरावा लागावा म्हणून सरकारने सात टॅक्स स्लॅब असलेली पर्यायी आयकर प्रणाली आणली आहे. सीतारामन पुढे म्हणाल्या की, जुन्या कर प्रणालीमध्ये प्रत्येक करदाता सुमारे 7-10 मार्गांनी सूटचा दावा करु शकतो.

नवीन प्रणालीमध्ये कोणतीही सूट नाही

जुन्या कर प्रणालीमध्ये, उत्पन्नाच्या मर्यादेनुसार आयकर दर 10, 20 आणि 30 टक्के दरम्यान होते. सितारामन म्हणाल्या की, 'जुन्या कर प्रणालीबरोबरच सरकारने आणखी एक प्रणाली आणली आहे, ज्यामध्ये कोणतीही सूट नाही, परंतु ती सोपी असून करही कमी आहे.' त्या पुढे म्हणाल्या की, 'मला सात स्लॅब बनवावे लागले जेणेकरुन कमी उत्पन्न (Income) गटातील लोकांना कमी दर मिळतील.'

तसेच, आयकर सवलतीची मर्यादा अडीच लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी करदात्यांनी अनेक दिवसांपासून सरकारकडे केली आहे. यासोबतच 80C अंतर्गत गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचीही मागणी आहे. सरकार (Government) कोणत्या मागण्यांवर विचार करते आणि 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली जाते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT