Budget 2023: अरे ये क्‍या? '...जेव्हा निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून'

Budget Speech: अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

FM Nirmala Sitharaman: 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात जनतेसाठी अनेक योजना असतील, असेही सांगण्यात येत आहे. शेतकरी, पगारदार वर्ग आणि व्यापारी वर्गालाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. आयकर सवलतीच्या बाबतीत पगारदार वर्गाला गेल्या अनेक अर्थसंकल्पात कोणताही दिलासा मिळालेला नाही. आता निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या रेकॉर्डबद्दल बोलूया...

Nirmala Sitharaman
Budget 2023: 'जे बोललो तेच केले...,' नव्या अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारने हे काय सांगितले

2020 चे अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यासाठी 2 तास 41 मिनिटे लागली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्प (Budget) सादर केला. हे बजेट वाचायला त्यांना अडीच तास लागले होते. यानंतर त्यांना 2020 चे अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यासाठी 2 तास 41 मिनिटे लागली. सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रमही निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे. या अर्थसंकल्पीय भाषणात 18 हजार 926 शब्द होते. यानंतर 2021 मध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प वाचण्यासाठी त्यांना 1 तास 50 मिनिटे लागली होती. 2022 मध्ये हा कालावधी 1 तास 32 मिनिटांपर्यंत कमी करण्यात आला होता.

2022 मध्ये सादर केलेले सर्वात छोटे बजेट भाषण

2022 मध्ये सादर केलेले बजेट निर्मला सीतारामन यांचे आतापर्यंतचे सर्वात छोटे बजेट भाषण होते. आता 2023 मध्ये त्या पाचव्यांदा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचा कालावधी देखील 2 तासांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. 2022 मध्ये त्यांनी लोकसभेत सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली आणि दुपारी 12.32 च्या सुमारास पूर्ण झाले होते. अशा प्रकारे, त्यांनी 1 तास 32 मिनिटांत ते पूर्ण केले.

Nirmala Sitharaman
Budget 2023: 1950 मध्ये Income Tax किती होता, स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे 'हे' डॉक्युमेंट व्हायरल!

आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट भाषण

2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2 तास 40 मिनिटे आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण वाचले होते. यानंतर 2019 मध्ये 2 तास 15 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 2003 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी 2 तास 13 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण वाचले होते, ते तिसरे मोठे अर्थसंकल्पीय भाषण होते. 2014 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणासाठी 2 तास 10 मिनिटे घेतली होती.

Nirmala Sitharaman
Budget 2023: मोदीजी तुम्हीच! नव्या अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिलेले आश्वासन केले पूर्ण

सर्वात लहान बजेट भाषण

जर शब्दांबद्दल बोलायचे झाल्यास, निर्मला सीतारामन यांच्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये 18,650 शब्दांचे बजेट भाषण वाचले होते. आतापर्यंतच्या सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम 1977 मध्ये हिरुभाई एम. पटेल यांच्या नावावर आहे. त्यावेळी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी 800 शब्दांचे सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण काही मिनिटांत पूर्ण केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com