Flipkart Danik Gomantak
अर्थविश्व

Flipkart Big Saving Days sale: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर मिळणार 75 टक्के सूट

Amazon प्रमाणे, 6 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्स डे सेलला सुरूवात होणार आहे तसेच हा सेल 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

दैनिक गोमन्तक

Amazon प्रमाणे, 6 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्स डे सेलला सुरूवात होणार आहे तसेच हा सेल 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सेलमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या उत्पादनांवर 75% पर्यंत सूट मिळवू शकणार आहात. सेलमध्ये, कंपनी ICICI आणि कोटक बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील ऑफर करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर फ्लिपकार्ट Shop at Sale Price Before Sale योजनेअंतर्गत अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणामध्ये सूट देत आहे. (Flipkart Big Saving Days sale 75 percent discount on electronics products)

फ्लिपकार्टवरील लाइव्ह मायक्रोसाइटनुसार, वापरकर्ते रश अवर्स डीलमध्ये प्रचंड सूट देऊन दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत खरेदी करू शकणार आहेत. त्याचप्रमाणे, दररोज रात्री 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता, कंपनी विक्रीतील काही सर्वोत्तम सौदे ऑफर देखील करणार आहे. टिकटॉक डील हे फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग्ज डे सेलचा एक भाग आहेत ज्यामध्ये उत्पादने सर्वात कमी किमतीत ऑफर केली जाणार आहेत.

एअर कंडिशनर्सवर 55 टक्क्यांपर्यंत

कंपनी टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर 75 टक्के सूट देत आहे. ही ऑफर Samsung, Realme, Xiaomi सारख्या ब्रँडच्या टीव्हीवर उपलब्ध असणार आहे. याशिवाय एअर कंडिशनरवर 55 टक्के आणि मायक्रोवेव्हवर 45 टक्क्यांपर्यंत सूट असेल तसेच वेअरेबल्सवर 10 ते 70 टक्के सूट देण्यात येणार आहे.

याशिवाय, ग्राहकांना Apple, Vivo, Oppo, Motorola आणि इतर ब्रँड्सच्या लोकप्रिय फोनवरही उत्तम सौदे मिळणार आहेत. आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या सेल इव्हेंटची वाट पाहणारे वापरकर्ते या सेल इव्हेंटद्वारे सवलतीच्या दरात आयफोन खरेदी करू शकणार आहेत. iPhone 11 आधीच फ्लिपकार्टवर 41,999 रुपयांच्या मूळ किमतीसह उपलब्ध आहे तर त्याच वेळी, iPhone 12 ची किंमत सध्या 59,999 रुपये असणार आहे. सेलमधील या दोन्ही आयफोनच्या किमती आणखी खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT