Ambani vs Adani: मुकेश अंबानी अन् गौतम अदानी उतरणार बायोगॅस क्षेत्रात

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील टेलिकॉमनंतर, आशियातील दोन सर्वात मोठ्या श्रीमंतांमध्ये आता दुसऱ्या क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
Gautam Adani And Mukesh Ambani
Gautam Adani And Mukesh AmbaniDainik Gomantak

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यातील टेलिकॉमनंतर, आशियातील दोन सर्वात मोठ्या श्रीमंतांमध्ये आता दुसऱ्या क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी यांची कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज (ANIL) यांनी प्रत्येकी दोन कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्लांट उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Mukesh Ambani and Gautam Adani will enter the biogas sector)

Gautam Adani And Mukesh Ambani
Uber New Feature: WhatsApp वर करा Uberचे कॅब, बाईक, ऑटो बुकींग

ANIL ची 500 ते 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह

उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये वार्षिक 40 दशलक्ष टन क्षमता आणण्याची योजना आहे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने अद्याप त्यांच्या प्लांटसाठी जागा निश्चित केलेली नाहीये. या दोन्ही कंपन्या यासाठी 500 ते 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समोर येत आहे.

अदानी आणि रिलायन्स अनेक प्लांट्ससह या विभागात प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे. कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) हा कृषी कचरा, शुगरकेन प्रेस मड आणि म्युनिसिपल कचर्‍यापासून बनवण्यात येतो. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी सीबीजीचा वापर करण्याचाही विचार केला जात असल्याचे सांगितेले जात आहे तसेच हे घरगुती वापरता येते. ते घरांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) बदलू शकते. रिटेल आउटलेटमधून वाहनांमध्ये इंधन म्हणून CBG आणि CNG विकता येणार आहे. तसेच, CBG तुमच्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) नेटवर्कमध्ये ठेवता येईल तसेच घरगुती आणि किरकोळ वापरकर्ते ते वापरू शकणार आहेत.

जिओ-बीपी ब्रँडसह

रिलायन्सने पुढे बीपी, रिलायन्स बीपी मोबिलिटीसह संयुक्त उपक्रम स्थापन केले. या कंपनीचे देशभरात Jio-BP ब्रँड अंतर्गत 1400 हून अधिक पेट्रोल पंप आहेत, त्याचप्रमाणे अदानी समूहाची उपकंपनी असलेली अदानी टोटल गॅस ही सिटी गॅस वितरणात खूप मोठ्याप्रमाणात सक्रिय आहे.

Gautam Adani And Mukesh Ambani
Loan on PAN Card: पॅन कार्डवर किती वैयक्तिक कर्ज मिळणार, त्याच्या अटी काय आहेत?

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या (सीबीजी) आकर्षक किमतींमुळे खासगी कंपन्यांचा कल देखील दिवसेंदिवस वाढत आहे. 2018 मध्ये त्याची किंमत 46 ते 56 रुपये प्रति किलो होती, जी आता 70 ते 76 रुपये प्रति किलो झाली.

सीबीजीच्या उत्पादनानंतर हे लक्ष्य खत म्हणून वापरले जाईल. CBG चे उत्पादन आणखी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2018 मध्ये एक योजना सुरू केली होती तर या योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात 5,000 CBG प्लांट्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तसेच बायोगॅसमध्ये 60 टक्के मिथेन, 40-45 टक्के कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फाइड असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com