Tecno Phantom V Fold|Samsung Galaxy Z Fold 5| Google Pixel Fold|OnePlus Open Dainik Gomantak
अर्थविश्व

Flashback 2023: फोल्डेबल फोन्ससाठी हे वर्ष ठरले खास, 'या' फोन्सनी वेधले सर्वांचे लक्ष

Ashutosh Masgaunde

Foldable smartphones launched in 2023 in india:

2023 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. 2023 हे वर्ष स्मार्टफोन मार्केटसाठी खूप खास होते. फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करण्याची प्रक्रिया या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झाली होती.

2023 मध्ये अनेक पॉवरफुल आणि किलर स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. केवळ फीचर्समध्येच नाही तर हे सर्व स्मार्टफोन किंमतीतही पॉवरफुल होते.

दरम्यान आपण यंदाच्या वर्षात बाजारात आलेल्या महागड्या आणि फोल्डेबल फोनबद्दल बोलणार आहोत.

OnePlus Open

फोल्डेबल फोन्ससाठी 2023 खूप खास होते. या वर्षी अनेक टेक ब्रँड्सनी त्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले. यामध्ये, OnePlus ने त्यांचा पहिला फोल्डेबल OnePlus Open देखील लॉन्च केला.

कंपनीने या प्रीमियम फोल्डेबल फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 48+64+48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

OnePlus Open ची किंमत 16 GB RAM आणि 512 GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 1,39,999 रुपये आहे आणि Emerald Dusk आणि Voyager Black या दोन रंगांमध्ये तो उपलब्ध आहे.

Google Pixel Fold

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलनेही आपला फोल्डेबल स्मार्टफोन यावर्षी बाजारात लॉन्च केला आहे.

Google ने Google I/O 2023 इव्हेंट दरम्यान तो कॅलिफोर्नियामध्ये लॉन्च केला. Google Pixel Fold ला कंपनीने Tensor G2 SoC चिपसेट सह सादर केले होते.

यामध्ये कंपनीने 256GB आणि 512GB स्टोरेज दिले आहे. गुगलने तो सुमारे दीड लाख रुपयांच्या किमतीत सादर केला होता. यात 48 मेगापिक्सेलचा बेसिक कॅमेरा आहे.

Samsung Galaxy Z Fold 5

Samsung ने आपला Samsung GalaxyZ Fold 5 या वर्षी ऑगस्ट महिन्यात बाजारात आणला होता.

हा स्मार्टफोन Qualcomm SM8550-AC Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो. यामध्ये कंपनीने 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिले आहे.

फोटोग्राफीसाठी, यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, यात 4400mAh बॅटरी आहे.

यासाठी कंपनीने याची बेसिक किंमत 164999 रुपये ठेवली आहे.

Tecno Phantom V Fold

स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने या वर्षी एप्रिल महिन्यात Tecno Phantom V Fold लाँच केला होता.

टेक्नोच्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 7.58 इंच डिस्प्ले आहे. यात Mediatek Dimensity 9000+ प्रोसेसर आहे. यात 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे.

दरम्यान, या वरील सर्व फोल्डेबल फोन्समध्ये टोक्नोचा हा फोन सर्वात स्वस्त असून, याची किंमत 69999 रुपये इतकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT